मॉस्को : लाल कार्ड मिळाल्यामुळे कोलंबियाचा संघाला एका खेळाडूची उणीव जाणवत होती. पण कोलंबियाने या गोष्टीचा विचार न करता खेळावर लक्ष केंद्रीत केले आणि त्यामुळेच त्यांना पहिल्या सत्रात जपानशी 1-1 अशी बरोबरी करता आली.
सामन्याच्या तिसऱ्या मिनिटालाच जपानने कोलंबियाव जोरदार आक्रमण लगावले. जपानचा संघ कोलंबियाच्या गोलपोस्टजवळ दाखल झाला होता. जपानच्या कागावाने यावेळी कोलंबियाच्या गोलपोस्टवर चेंडू मारला. कोलंबिलाच्या गोलपोस्टसमोरच सांचेज उभा होता. त्यावेळी कागावाने मारलेला चेंडू हा सांचेझच्या हाताला लागला. त्यामुळे पंचांनी थेड सांचेझला लाल कार्ड दाखवले. पंचांनी नियमांप्रमाणे जपानला स्पॉक किक दिली. कागावे ही स्पॉट किक घेतली आणि सामन्याच्या सहाव्या मिनिटाला जपानला पहिला गोल करता आला.
कोलंबियाचा संघ लाल कार्ड मिळाल्यामुळे हताश झाला नाही. कोलंबियाच्या क्विंटेरोने गोल करत संघाला जपानशी 1-1 अशी बरोबरी करून दिली.