पॅरिस : गतविजेत्या जर्मनीला फुटबॉल विश्वचषकासाठी फिफा रँकिंगमध्ये अव्वल स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे जर्मनीच्या संघाचा आत्मविश्वास वाढेल.रशियाला जाण्याच्या आधी संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कारण त्याचा महत्त्वाचा खेळाडू आणि गोलकिपर मॅन्युअल नुएर दुखापतीनंतर परतला आहे. २०१४ च्या फुटबॉल विश्वचषकात त्याने मोठी भूमिका बजावली होती. ब्राझीलच्या संघाला दुसरे स्थान देण्यात आले आहे. तर प्रतिभावान खेळाडूंचा भरणा असलेल्या बेल्जिअमला तिसरे स्थान देण्यात आले आहे. युरोपियन चॅम्पियन पोर्तुगाल चौथ्या तर लियोनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाला पाचवे स्थान देण्यात आले आहे.विश्व चषकाचा यजमान रशिया सलग सात सामन्यात विजय मिळवू न शकल्याने ७० व्या स्थानावर घसरला आहे. यजमान संघ १४ जून रोजी सौदी अरब विरोधातील सामन्याने आपल्या अभियानाला सुरुवात करेल.रँकिग पुढीलप्रमाणे, (अव्वल दहा संघ अनुक्रमे)जर्मनी, ब्राझील, बेल्जिअम, पोर्तुगाल, अर्जेंंटिना, स्वित्झर्लंड, फ्रान्स, पोलंड, चिली, स्पेन.
FIFA World Cup 2018 : विश्व कप रँकिंगमध्ये जर्मनीला अव्वल मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 1:29 AM