सचिन खुटवळकर
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील पदार्पणाच्या साखळी सामन्यात अर्जेंटिनासारख्या मातब्बर संघाला १-१ असे बरोबरीत रोखल्यानंतर जगभरात कौतुकाचा वर्षाव होत असलेल्या आइसलँड संघाने सोशल मीडियावर धूम माजवली आहे. या संघात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले ५ खेळाडू असून प्रशिक्षक हिमीर हॉलग्रिमसन हे दंतचिकित्सक (डेंटिस्ट) आहेत, तर लियोनेल मेस्सीची पेनल्टी किक अडविण्याचा पराक्रम केलेला गोलरक्षक हॅनेस हॉलडर्सन हा कॅमेरामन कम चित्रपट दिग्दर्शक आहे. या संघाचा एक डिफेंडर बर्किक सावेर्सन एका मीठ निर्मिती कारखान्यात काम करतो आणि विश्वचषक खेळण्यासाठी त्याने चक्क रजा घेतलीय.
- केवळ ३.३0 लाख लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा देशाने विश्वचषकासाठी पात्रता मिळविल्यापासून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
- २0१६मध्ये युरो चषकात मातब्बर म्हणून गणल्या जाणाºया पोर्तुगालला १-१ असे बरोबरीत रोखण्याची किमया आइसलँडने केली होती. त्याचबरोबर हंगेरी व आॅस्ट्रिेलियाला पराभूत करण्याची कामगिरीही नोंदविली होती.
- आइसलँडच्या या यशामागे नशीब किंवा योगायोग या गोष्टी नसून त्यासाठी त्यांनी अनेक वर्षे घेतलेली कठोर मेहनत आहे.
- अर्जेंटिनाला रोखल्यानंतर आइसलँडच्या लोकप्रियतेत वाढ झाली असून रुरिक गिस्लासन या खेळाडूला दोन दिवसांत तब्बल साडेतीन लाख इन्स्टाग्राम फॉलोअर्स मिळाले आहेत.
- सध्या ट्विटर, फेसबुक व इन्स्टाग्रामवर आइसलँडचाच बोलबाला असून त्यांच्या या यशामुळे अर्जेंटिना व मेस्सी ‘ट्रोल’ होत आहेत.
- आता क्रोएशिया व नायजेरियाशी दोन हात करण्यासाठी आइसलँड सज्ज होत आहे.