मॉस्को : फुटबॉल विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात कोलंबियावर 2-1 असा विजय मिळवत जपानने इतिहास रचला आहे. जपान हा आशियातील असा पहिला देश ठरला आहे, की ज्या देशाने दक्षिण अमेरिकेतील देशाला पहिल्यांदा पराभूत केले आहे. यापूर्वी आशियामधील एकाही देशाला दक्षिण अमेरिकेतील संघांना पराभूत करता आले नव्हते.
या सामन्यात जपानपेक्षा कोलंबियाकडून चाहत्यांना फार मोठ्या अपेक्षा होत्या. कारण कोलंबियाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली होती. त्याचबरोबर त्यांच्या जेम्स रॉड्रीगेझवर साऱ्यांच्या नजरा होत्या. पण या सामन्यात जेम्स सपशेल अपयशी ठरला आणि त्याचाच फटका कोलंबियाला बसला.
जपानने सहाव्या मिनिटाला स्पॉट किकच्या जोरावर पहिला गोल केला. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटालाच जपानने कोलंबियाव जोरदार आक्रमण लगावले. जपानचा संघ कोलंबियाच्या गोलपोस्टजवळ दाखल झाला होता. जपानच्या कागावाने यावेळी कोलंबियाच्या गोलपोस्टवर चेंडू मारला. कोलंबिलाच्या गोलपोस्टसमोरच सांचेज उभा होता. त्यावेळी कागावाने मारलेला चेंडू हा सांचेझच्या हाताला लागला. त्यामुळे पंचांनी थेड सांचेझला लाल कार्ड दाखवले. पंचांनी नियमांप्रमाणे जपानला स्पॉक किक दिली. कागावे ही स्पॉट किक घेतली आणि सामन्याच्या सहाव्या मिनिटाला जपानला पहिला गोल करता आला. त्यानंतर सामन्याच्या 39व्या मिनिटाला कोलंबियाच्या क्विंटोरेने गोल केला. त्यामुळे कोलंबियाला सामन्यात 1-1 अशी बरोबरी करता आली.
मध्यंतरापर्यंत जपान आणि कोलंबिया यांच्यामध्ये 1-1 अशी बरोबरी होती. पण त्यानंतर ओसाकोने सामन्याच्या 73व्या मिनिटाला कॉर्नरवर हेडर मारत संघाला दुसरा गोल करून दिला. या गोलनंतर जपानने बचावावर अधिक भर दिला आणि कोलंबियाचे आक्रमण थोपवत 2-1 असा विजय मिळवला.