ठळक मुद्देसामन्याच्या 40व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री-किकचा पुरेपूर फायदा घेत व्हॅरनेने संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाची जबाबदारी निभावली.
निजनी : रफाएल व्हॅरनेच्या गोलच्या जोरावर फ्रान्सने उरुग्वेविरुद्धच्या फुटबॉल विश्वचकातील उपांत्यपूर्व सामन्याच्या पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या 40व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री-किकचा पुरेपूर फायदा घेत व्हॅरनेने संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाची जबाबदारी निभावली.
पहिल्या सत्रामध्ये उरुग्वेपेक्षा फ्रान्सने जोरदार आक्रमण लगावले. उरुग्वेपेक्षा फ्रान्सनेच चेंडूवर जास्त ताबा मिळवला, त्याचबरोबर जास्त पासेसही फ्रान्सनेच केले. फ्रान्सने गोल केल्यावर उरुग्वेच्या संघाला 43 व्या मिनिटाला गोल करण्याची संधी होती, पण या संधीचे सोने त्यांना करता आले नाही.