मॉस्को : गोल झाल्यावर संघातील प्रत्येक खेळाडूचा आनंद गगनात मावेनासा होतो. गोल झाल्यावर सर्व खेळाडू एकत्र येऊ आनंद साजरा करतात. इंग्लंड आणि ट्युनिशिया यांच्यातील फुटबॉल विश्वचषकाच्या सामन्यात असाच एक क्षण आला. केनने दमदार गोल करत इंग्लंडला विजयी केले. इंग्लंडचा सर्व संघ आनंद साजरा करत होता, अपवाद फक्त त्या एका खेळाडूचा होता.
केनने इंग्लंडसाठी गोल केला तेव्हा त्या खेळाडूला आनंद झाला नाही का? पण खरं तर त्या खेळाडूने मारलेल्या किकवरच केनने गोल केला होता. त्यामुळे त्या खेळाडूने आनंद साजरा करायला हवा होता. तो खेळाडू केनबरोबर टोटनहॅम क्लबमध्ये एकत्र खेळत होता, तरी तो खेळाडू केन आणि इंग्लंड संघाच्या आनंदात सहभागी झाला नाही.
तुम्हाला वाटेल की त्या खेळाडूला केनचा मत्सर वाटत असावा, पण तसे नक्कीच नाही. उलट तो खेळाडू तसा वागला म्हणून इंग्लंडवर गोल झाला नाही. तो खेळाडू म्हणजे किएरन र्टीपीअर. इंग्लंडचा संघ आनंद साजरा करत होता. त्यावेळी जर किएरन पण त्यांच्याबरोबर आनंद साजरा करण्यासाठी गेला असता तर फिफाच्या नियमांनुसार गोल करण्याची नामी संधी ट्युनिशियाला मिळाली असती.
काय आहे नियमजर संपूर्ण संघ मैदानाबाहेर जाऊन आनंद साजरा करण्यात मग्न असेल तर पंच सामना सुरु करतात. त्यावेळी इंग्लंडचा एकही खेळाडू मैदानात नसला असता आणि ट्युनिशियाने खेळ सुरु केला असता तर त्यांना सहज गोल करता आला असता.