लंडन : साल 1966... इंग्लंडमध्ये फुटबॉल विश्वचषक खेळवण्यात येणार होता. विश्वचषकाच्या सहा महिन्यांपूर्वी त्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले आणि चाहत्यांसाठी त्याचे एक प्रदर्शनही ठेवण्यात आले. या प्रदर्शनादरम्यान विश्वचषक चोरीला गेला. साऱ्यांनाच हा मोठा धक्का होता. पण अखेर हा विश्वचषक सापडला तो एका श्वानामुळे.
इंग्लंडमधील सिडनी कुगुलेर आणि त्याचा भाऊ रेग या दोघांनी हा चषक चोरला होता. चषक चोरीला गेल्यावर इंग्लंडमध्ये एकच हडकंप झाला. इंग्लंडच्या सरकारने हे प्रकरण स्कॉटलंड पोलिसांकडे सुपूर्द केले होते. स्कॉटलंड पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांनी कसून तपास केला आणि अखेर ही ज्युलेस रिमेट ही ट्रॉफी सापडली.
ज्युलेस रिमेट ही ट्रॉफी चोरीला गेल्यावर सात दिवसांनी सापडली ती एका श्वानाजवळ. पिक्लेस हे त्या श्वानाचं नाव. कुगुलेर बंधूंच्या बंगल्याबाहेर ही ट्रॉफी सापडली. त्यानंतर स्कॉटलंड पोलिसांच्या तपासाला वेग आला आणि त्यांनी या चोरीचा छडा लावला.