शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

FIFA World Cup Trophy: फिफा वर्ल्डकप कुणीही जिंको, पण विजेत्या संघाला खरी ट्रॉफी मिळणारच नाही; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 3:12 PM

कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आज फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना यांच्यात सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना रात्री साडेआठ वाजल्यापासून पाहता येणार आहे.

कतार-

कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आज फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना यांच्यात सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना रात्री साडेआठ वाजल्यापासून पाहता येणार आहे. दोहाच्या लुसैल स्टेडियममध्ये फायनलची लढत रंगणार आहे. दोन्ही संघ तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरण्यासाठी उत्सुक आहेत. फ्रान्सनं मोरक्को आणि अर्जेंटिनानं क्रोएशियावर मात करुन फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 

आता फायनलमध्ये जो संघ जिंकेल त्या संघाला दिल्या जाणाऱ्या ट्रॉफीचीही एक रोमांचक कहाणी आहे. आज फायनलच्या लढतीत विजेत्या संघाला ओरिजनल ट्रॉफी फक्त विजयाचं सेलिब्रेशन करण्यापुरतीच दिली जाणार आहे. पुरस्कार सोहळा संपला की फिफाचे अधिकारी विजेत्या संघाकडून खरी ट्रॉफी परत घेणार आहेत. याचा अर्थ असा की फ्रान्स किंवा अर्जेंटिना संघाला खरी ट्रॉफी आपल्यासोबत घेऊन जाता येणार नाही. विजेत्या संघाला ड्युप्लिकेट ट्रॉफी दिली जाईल. ही ड्युप्लिकेट ट्रॉफी तांब्यानं बनवलेली असते आणि त्यावर सोन्याचं पाणी चढवलं जातं. 

फिफा वर्ल्डकपची ओरिजनल ट्रॉफी ज्युरिख स्थित फिफाच्या मुख्यालयात ठेवण्यात येते. फिफा वर्ल्ड कप टूअर आणि वर्ल्डकप सामन्यावेळीच ही खरी ट्रॉफी सर्वांसमोर आणली जाते. २००५ साली फिफानं नियम केला की विजेत्या संघाला ओरिजनल ट्रॉफी घरी नेता येणार नाही. 

फूटबॉल वर्ल्डकपची सुरुवात १९३० साली झाली होती. त्यावेळी विजेत्या संघाला जी ट्रॉफी दिली गेली तिचं नाव जूल्स रिमेट ट्रॉफी देण्यात आलं होतं. जूल्स रिमेट ट्रॉफी १९७० पर्यंतच चॅम्पियन संघाला दिली गेली. यानंतर वर्ल्डकपची ट्रॉफी नव्यानं डिझाइन करण्यात आली. नव्या ट्रॉफीचं काम इटालियन आर्टिस्ट सिल्वियो गजानिया याला देण्यात आलं होतं. १९७४ सालच्या वर्ल्डकपपासून नवी ट्रॉफी दिली जाऊ लागली. जिला फिफा वर्ल्डकप ट्रॉफी नावानं संबोधलं जाऊ लागलं. 

१८ कॅरेट सोन्याचा वापरफिफा वर्ल्डकपच्या ओरिजनल ट्रॉफीचं वजन जवळपास ६.१७५ किलो इतकं आहे आणि ती बनवण्यासाठी १८ कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे. ट्रॉफीची लांबी ३६.८ सेंटीमीटर आणि व्यास १३ सेंटीमीटर इतका आहे. ट्रॉफीच्या बेसवर मॅलाकाइट स्टोनचे दोन स्तर आवरण देण्यात आलं आहे. १९९४ साली या ट्रॉफीमध्ये थोडा बदल करण्यात आला आणि विजेत्या संघाचं नाव लिहिण्यासाठी ट्रॉफीच्या खाली एक प्लेट लावण्यात आली. फायनलमध्ये विजेत्या संघाला ३४७ कोटी आणि उपविजेत्या संघाला २४८ कोटी रुपयांचं बक्षिस देण्यात येणार आहे. 

टॉप- चार सिनेमांचं प्राइज मनीविजेता- ३४७ कोटी रुपयेउप-विजेता- २४८ कोटी रुपयेक्रोएशिया- २२३ कोटी रुपयेमोरक्को- २०६ कोटी रुपये

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Footballफुटबॉल