FIFA World Cup 2022: अरे बापरे! फायटर जेट्सच्या सुरक्षिततेत पोलंडचा संघ कतारमध्ये दाखल, जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 11:24 AM2022-11-18T11:24:57+5:302022-11-18T11:25:59+5:30
FIFA World Cup 2022: कतार येथे २० नोव्हेंबरपासून फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी ३२ संघ हळुहळू दाखल होण्यास सुरू झाले आहेत.
FIFA World Cup 2022: कतार येथे २० नोव्हेंबरपासून फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी ३२ संघ हळुहळू दाखल होण्यास सुरू झाले आहेत. पण, पोलंडच्या संघाला F-16 या दोन फायटर जेट्सच्या सुरक्षिततेत कतारमध्ये दाखल व्हावे लागले. काही दिवसांपूर्वी झालेल्या मिसाईल हल्ल्यात दोन पोलिश नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि त्यामुळेच पोलंडच्या फुटबॉल संघाच्या विमानासोबत दोन फायटर जेट्स सोबत उडताना दिसले. रिपब्लिक ऑफ पोलंडने त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
गर्लफ्रेंड्ससाठी 'पाण्या'सारखा पैसा; इंग्लंडच्या फुटबॉलपटूंनी बुक केलं ९६८९ कोटींचं हॉटेल, Photo
- पोलंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघानेही F-16 फायटर जेट्स सोबत उडतानाचे काही फोटो सोशल मीडियाव पोस्ट केले आहेत
- पोलंडची हवाई हद्द ओलांडेपर्यंत पोलंड फुटबॉल संघाच्या विमानासोबत हे फायटर प्लेन होते आणि संघाने दोहा येथे त्यानंतर सुरक्षित लँडिंग केले. पोलंडचा पहिला सामना २२ नोव्हेंबरला होणार आहे.
- प्रीझेवोडोव येते सोव्हिएतचे रॉकेट येऊन पडले आणि त्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे पोलंडच्या फुटबॉल संघाला सुरक्षा पुरवण्यात आली.
- पोलंड हा NATO सदस्य आहे. रशिया व युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असल्याने काही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
- पोलंडच्या फुटबॉल संघाला C गटात मेक्सिको, अर्जेंटिना व सौदी अरेबिया या तगड्या संघाचा सामना करायचा आहे
- ३० नोव्हेंबरला गटातील अखेरच्या सामन्यात त्यांना लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाचा सामना करायचा आहे
Do południowej granicy Polski eskortowały nas samoloty F16! ✈️ Dziękujemy i pozdrawiamy panów pilotów! 🇵🇱 pic.twitter.com/7WLuM1QrhZ
— Łączy nas piłka (@LaczyNasPilka) November 17, 2022
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"