शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

Fifa World Cup 2022 : लिओनेल मेस्सीने मोडला ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विक्रम, अर्जेंटिनाने पटकावले उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 1:04 PM

Fifa World Cup 2022, Round 16 : लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय मिळवला.

Fifa World Cup 2022, Round 16 : लिओनेल मेस्सीच्याअर्जेंटिना संघाने फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय मिळवला. संघाचा स्टार खेळाडू मेस्सीचा हा १००० वा सामना होता आणि त्याने या सामन्यात गोल करून कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डो याचा विक्रम मोडला. या विजयासह अर्जेंटिनाने उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट बुक केले.

मेस्सीने ३५व्या मिनिटाला गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर उत्तरार्धातही अर्जेंटिनाने प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवत ७७व्या मिनिटाला दुसरा गोल केला. ज्युलियन अल्वारेझने दुसरा गोल करत संघाला विजयपथावर आणले. त्याच वेळी ऑस्ट्रेलियन संघाला गोल करता येत नव्हते, परंतु अर्जेंटिनाचा खेळाडू एन्झो फर्नांडिसने चुकून आपल्याच संघाविरुद्ध गोल केला आणि ऑस्ट्रेलियाला पुनरागमनाचे स्वप्न पडू लागले. पण, अर्जेंटिनाने बचाव भक्कम केला.

 लिओनेल मेस्सीने इतिहास रचलालिओनेल मेस्सीने अर्जेंटिनासाठी १०००व्या सामन्यात इतिहास रचला. या सामन्यात त्याने संघासाठी पहिला गोल केला आणि वर्ल्ड कप स्पर्धेत संघासाठी सर्वाधिक ९ गोल करणारा खेळाडू ठरला. ही कामगिरी करून त्याने डिएगो मॅराडोनाला मागे टाकले आहे. याशिवाय त्याने नॉकआऊट सामन्यात प्रथमच गोल केला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत मेस्सीने पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही मागे टाकले. 

ऑस्ट्रेलियाला हरवून अर्जेंटिनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर नेदरलँड संघाने ऑफ-16 च्या पहिल्या सामन्यात अमेरिकेचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. ९ डिसेंबर रोजी दोन्ही संघ आमनेसामने असतील.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Argentinaअर्जेंटिनाLionel Messiलिओनेल मेस्सीCristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डो