Fifa World Cup, ARG vs KSA : कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत लिओनेल मेस्सी व ख्रिस्तियानो रोनाल्डो या जगातील दोन सुपरस्टार खेळाडूंकडे पुन्हा एकदा लक्ष लागले आहेत. या दोन्ही महान खेळाडूंनी आपापल्या देशासाठी व क्लब्ससाठी अनेक ट्रॉफी जिंकल्या आहेत, परंतु वर्ल्ड कप ही एकमेव ट्रॉफी त्यांच्या खात्यात नाही. हा कदाचित त्यांना अखेरचा वर्ल्ड कप असल्याने यंदा हा दुष्काळ कोण संपवतं याची उत्सुकता लागली आहे. त्यात अर्जेंटिनाने आज वर्ल्ड कप स्पर्धेत सौदी अरेबिया ( ARGENTINA vs SAUDI ARABIA) विरुद्ध मोहिमेची सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात लिओनेल मेस्सीने ( Lionel Messi ) विक्रमाला गवसणी घातली.
इंग्लंडचा फॅन बिअरच्या शोधात पोहोचला 'शेख'च्या घरात, त्याने दाखवले वाघ, सिंह अन्... Video
फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत आज लिओनेल मेस्सी मैदानावर उतरणार, अर्जेंटिना आणि सौदी अरेबिया यांच्यात सामना. FIFAWorldCup स्पर्धेत दोन्ही संघ प्रथमच भिडत आहेत आणि याआधीच्या ४ सामन्यात अर्जेंटिना ( २ विजय २ अनिर्णित) अपराजित आहे. अर्जेंटिनाची ही १८ वी वर्ल्ड कप स्पर्धा आहे आणि ते सलग १३ वेळा या स्पर्धेत खेळत आहेत. ब्राझील (२२) आणि जर्मनी (१८) यांच्या नंतर अर्जेंटिना सलग सर्वाधिक वर्ल्ड कप खेळणारा संघ आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात चार खेळाडू ३४+ वर्षांचे खेळवणारा अर्जेंटिना हा पहिलाच संघ ठरला. अर्जेंटिनाच्या संघात मेस्सी, निकोलस ओटामेंडी, अँजेल डी मारिया आणि पापू गोमेझ हे ३४ + वयाचे खेळाडू आहेत.
लिओनेल मेस्सीने पेनल्टीवर अर्जेंटिलाना १०व्या मिनाटाला१-० अशी आघाडी मिळवून दिली. सौदी अरेबियाचे खेळाडू रेफरीच्या निर्णयावर नाखूश दिसले. चार वर्ल्ड कप स्पर्धेत ( २००६, २०१४, २०१८ व २०२२) अर्जेंटिनाकडून गोल करणारा लिओनेल मेस्सी हा पहिला खेळाडू, तर जगभरातील पाचवा खेळाडू ठरला. यापूर्वी पेले, उवे सीलर, मिरोस्लाव्ह क्लोस व ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी अशी कामगिरी केली आहे. पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाने निर्विवाद वर्चस्व राखताना १-० अशी आघाडी मिळवली. सौदी अरेबियाचा बचाव चांगला राहिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"