Fifa World Cup, Brazil vs Serbia : पाचवेळच्या विश्वविजेत्या ब्राझिलने फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. पण, त्यांचा स्टार खेळाडू नेयमार ( Neymar) याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्यामुळे ब्राझिलच्या चिंतेत भर पडली आहे. सर्बियाविरुद्धच्या सामन्यात रिचार्लिसन ( Richarlison) याने दोन गोल ( ६२ मि. व ७३ मि.) करताना ब्राझिलच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. रिचार्लिसनचा अफलातून गोल या सामन्यात चर्चेचा विषय ठरला. ब्राझिलने वर्ल्ड कप स्पर्धेत सलामीच्या २२ पैकी १७ लढती जिंकल्या आहेत. नेयमार ( २०१४) याच्यानंतर पदार्पणात दोन गोल करणारा रिचार्लिसन हा पहिला ब्राझिलियन खेळाडू ठरला.
ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विश्वविक्रम अन् पोर्तुगालची विजयी सुरूवात; घानाकडून कडवी टक्कर
१९३४ साली ब्राझिललला स्पेनकडून सलामीच्या सामन्यात १-३ असा पराभव पत्करावा लागला होता आणि त्यानंतर मागील २० वर्ल्ड कप स्पर्धेंत ब्राझील अपराजित आहे. त्यांनी १७ सामने जिंकले आहेत, तर ३ अनिर्णित राखल्या आहेत. या सामन्यात नेयमारकडून ९ फाऊल झाले आणि २०२२च्या वर्ल्ड कपमधील हे सर्वोत्तम फाऊल आहेत.