शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

Fifa World Cup Final : १ मिनिट ३७ सेकंदात ग्रह फिरले! कायलिन एमबाप्पेच्या दोन गोलने अर्जेंटिनाला रडवले, विक्रम केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 22:26 IST

Fifa World Cup Final 2022 Live Updates :  फुटबॉलमध्ये अखेरच्या सेंकदातही काही होऊ शकते याची प्रचिती वर्ल्ड कप फायनलमध्ये आली.

Fifa World Cup Final 2022 Live Updates :  फुटबॉलमध्ये अखेरच्या सेंकदातही काही होऊ शकते याची प्रचिती वर्ल्ड कप फायनलमध्ये आली. ८०व्या मिनिटापर्यंत २-० अशा आघाडीवर असलेल्या अर्जेंटिनाला १ मिनिट व ३७ सेकंदात दोन धक्के बसले. कायलिन एमबाप्पेच्या दोन गोलने फ्रान्सच्या पाठीराख्यांमध्ये प्राण फुंकले

लिओनेस मेस्सीचा वर्ल्ड रेकॉर्ड! वर्ल्ड कप इतिहासात असा विक्रम आजतागायत कुणालाच जमला नाही 

अर्जेंटिनाने आज आक्रमक पवित्रा घेतलेला दिसला. ९व्या मिनिटाला अर्जेंटिनाने कॉर्नर कमावला अन् फ्रान्सच्या बचावपटूंनी चांगलाच कस लागलेला पाहायला मिळाला. अर्जेंटिनाचा प्रत्येक खेळाडू आज गोलसाठी भूकेला दिसला. फ्रान्सच्या बचावपटूंना आज निवांत श्वास घ्यायलाच दिला जात नव्हता. कधीही डिफेन्सीव्ह खेळावर भर न देणाऱ्या फ्रान्सला आज अर्जेंटिनाच्या पवित्र्यामुळे कोशात जावे लागले.१९व्या मिनिटाला डी पॉलने पेनल्टी बॉक्सबाहेर फाऊल केला अन् फ्रान्सला फ्री किक मिळाला. ऑलिव्हर जिरूडने हवेत गरूड भरारी घेत हेडरद्वारे चेंडूला दिशा दिली, परंतु तो पोस्टच्या वरून गेला. २१व्या मिनिटाला डी मारियाला पेनल्टी क्षेत्रात पाडले अन् अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. अपेक्षांचे प्रचंड ओझं घेऊन मेस्सी पेनल्टी घ्यायला आला अन् त्याने करिष्मा करून दाखवला. 

सांघिक खेळ कसा करावा याचं उत्तम उदाहरण ३६व्या मिनिटाला अर्जेंटियन खेळाडूंनी दाखवून दिले. मॅक एलिस्टर चेंडू ज्या पद्धतीने घेऊन पेनल्टी क्षेत्रात घेऊन गेला त्याला रोखण्यासाठी फ्रान्सची फौज उभी राहिली, परंतु त्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधलेय हे दिसताच चेंडू डी मारियाला दिला अन् अर्जेंटिनाची आघाडी २-० अशी झाली. पहिल्या हाफमध्ये फ्रान्स हताश झालेले दिसले. 

दमलेल्या फ्रान्सची कहाणी, अर्जेंटिनाची लै भारी कामगिरी! घोंगावले मेस्सीमय 'निळे' वादळ  

दीपिकाच्या हाती 'वर्ल्ड' कप! आतापर्यंत जे कुणालाच नाही जमलं ते बॉलिवूड अभिनेत्रीनं केलं...!

दुसऱ्या हाफमध्येही अर्जेंटिनाचा तोच पवित्रा दिसला अन् ४८व्या मिनिटाला त्यांच्याकडून आणखी एक ऑन टार्गेट प्रयत्न झाला. मेस्सीने चेंडूवर ताबा राखताना फ्रान्सच्या बचावपटूंचा छळ करणं सुरूच ठेवलं होतं. फ्रान्सकडून आता धक्काबुक्कीचा खेळ सुरू झाला आणि त्यात अर्जेंटिनाचे खेळाडू जखमी झालेले दिसले. पण, त्यांचा आज निर्धार पक्का होता. आक्रमणाची धुरा अलव्हारेज व मेस्सीने  सक्षमपणे सांभाळली होती, तर बचावात डी मारिया, ख्रिस्टीयन रोमेरियो आदी उल्लेखनीय खेळ करताना दिसले. मेस्सी व अलव्हारेझ यांना रोखणे फ्रान्सच्या खेळाडूच्या हाताबाहेरचे होते. त्यांच्याकडून सातत्याने गोल प्रयत्न झाले, परंतु चेंडू यावेळेस पोस्ट शेजारून गेला. 

डी मारियाला ६४व्या मिनिटाला रिप्लेस केले गेले आणि या अनुभवी खेळाडूने मैदानाबाहेर जाताना चाहत्यांना अभिवादन केले. त्यांनीही टाळ्यांचा कडकडाट केला. फ्रान्स आज अर्जेंटिनाच्या तुलनेत कुठेच दिसले नाही. ऑलिव्हर जिरून, ग्रिएझमन या स्टार खेळाडूंना रिप्लेस करून फ्रान्स कोणती रणनीत आखत होते, हेत समजेनासे झाले. ७९व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या निकोलस ओटामेंडीने पेनल्टी क्षेत्रात स्टीव्ह मँडांडाला पाडले अन् फ्रान्सला पेनल्टी मिळाली. कायलिन एमबाप्पेने गोल करून फ्रान्सच्या चाहत्यांना जागं केलं... अखेरच्या १० मिनिटांत आता खरी लढत सुरू झाली. ८१व्या मिनिटाला एमबाप्पेने अर्जेंटिनाची बचावभींत भेदली अन् सामना २-२ असा बरोरीत आणला. जबरदस्त व्हॉलीद्वारे त्याने हा गोल केला... २३ वर्ष व ३६३ दिवसांच्या एमबाप्पेचा हा यंदाच्या वर्ल्ड कपमधील सातवा आणि एकंदर दहावा गोल ठरला आणि वर्ल्ड कप इतिहासात १० गोल करणारा तो युवा खेळाडू ठरला. त्याने गेर्ड मुलरचा ( २४ वर्ष व २२६ दिवस ) विक्रम मोडला. 

८७व्या मिनिटाला अर्जेंटियन खेळाडूकडून चूक झाली अन् पुन्हा पेनल्टी मिळेल असे वाटत असताना रेफरीच्या पिवळ्या कार्डवर त्यांचे भागले. 

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Argentinaअर्जेंटिनाFranceफ्रान्स