शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

Fifa World Cup, Portugal C. Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वर्ल्ड रेकॉर्ड! पेले, मेस्सी यांच्यासह कोणालाच जमला नाही हा पराक्रम, Video

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 11:17 PM

Fifa World Cup, Portugal vs Ghana C. Ronaldo : फुटबॉल कारकीर्दित अनेक विक्रम, अनेक चषकं नावावर असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ( Cristiano Ronaldo) चषकाच्या कपाटात वर्ल्ड कप नाही...

Fifa World Cup, Portugal vs Ghana C. Ronaldo : फुटबॉल कारकीर्दित अनेक विक्रम, अनेक चषकं नावावर असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ( Cristiano Ronaldo) चषकाच्या कपाटात वर्ल्ड कप नाही... कतार येथील हा वर्ल्ड कप कदाचित पोर्तुगालचा स्टार रोनाल्डो याचा अखेरचा असल्याने त्याला जेतेपदाची भेट देण्यासाठी सारेच प्रयत्नशील आहेत. त्याची प्रचिती घाना विरुद्धच्या पहिल्या साखळी सामन्यात आली. रोनाल्डोने या सामन्यात पेनल्टीवर गोल करून विश्वविक्रम नावावर केला.   

ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेला गोल रेफरीने नाकारला; पोर्तुगालच्या समर्थकांनी निषेध नोंदवला, Video 

आजच्या सामन्यात सर्वांचे लक्ष्य ३७ वर्षी ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्यावरच होते. कारकिर्दीतील अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत रोनाल्डोची कामगिरी कशी होते आणि तो वर्ल्ड कप उंचावतो का, याचीच सर्वांना उत्सुकता आहे. घानाविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने पहिल्या हाफमध्ये लौकिकास साजेसा खेळा केला, परंतु पोर्तुगालला गोल करता आला नाही. ३१ व्या मिनिटाला ख्रिस्तीयानो रोनाल्डोने गोल केला होता, परंतु चेंडू मिळवण्यासाठी त्याने घानाच्या खेळाडूला धक्का दिल्याने रेफरीने तो गोल अमान्य ठरवला. पोर्तुगालने पहिल्या हाफमध्ये चेंडूवर सर्वाधिक ताबा राखताना ४०० पासेस दिले. 

दुसऱ्या हाफमध्ये घानाचा खेळ उंचावलेला पाहायला मिळाला आणि त्यामुळे पोर्तुगालवर दडपण वाढलेले दिसले. त्यात घानाच्या खेळाडूंनी  प्रतिस्पर्धी खेळाडूंना शारीरिक ईजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे सामन्यातील वातावरण तापले होते. पण, ६५व्या मिनिटाला ख्रिस्तियानो रोनाल्डोने सर्वांना गप्प केले... रोनाल्डोला पेनल्टी क्षेत्रात पाडण्याची चूक घानाच्या बचावपटूकडून झाली आणि पोर्तुगालला पेनल्टी मिळाली. हाती आलेली संधी न सोडणे हेच रोनाल्डोने आतापर्यंत दाखवले आहे. त्याने गोल करून पोर्तुगालला १-० अशी आघाडी मिळवून दिली.   

 

पाच वेगवेगळ्या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये ( २००६, २०१०, २०१४, २०१८ व २०२२) गोल करणारा  रोनाल्डो हा जगातील पहिला खेळाडू ठरला. त्याने लिओनेल मेस्सी ( ४), मिरोस्लाव्ह क्लोस, पेले व उवे सीलर यांना मागे टाकले.

वर्ल्ड कप स्पर्धेत गोल करणारा रोनाल्डो हा दुसरा ( ३७ वर्ष व २९२ दिवस) वयस्कर खेळाडू ठरला. कॅमेरूनच्या रॉजर मिला याने १९९४ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ४२ वर्ष व ३९ दिवसांचा असताना गोल केला होता. पण, युरोपियन देशांमध्ये गोल करणारा रोनाल्डो वयस्कर खेळाडू ठरला, त्याने स्वीडनच्या ( १९५८ साली) गनर ग्रेन ( ३७ वर्ष व २३६ दिवस) याला मागे टाकले. ७७ व्या मिनिटाला आंद्रे आयेवकडून बरोबरीचा गोल झाला अन् पोर्तुगालच्या ताफ्यात पुन्हा चिंतेचं वातावरण पसरले. पण, पुढच्याच मिनिटाला जोओ फेलिस्कने सुरेख कौशल्य दाखवताना पोर्तुगालला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटाला राफेल लिओने गोल करून पोर्तुगालची आघाडी ३-१ अशी भक्कम केली.

 

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोPortugalपोर्तुगाल