मॉस्को : गुरुवारी होणाऱ्या रशिया विरुद्ध सौदी अरब या सामन्याद्वारे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या महासंग्रामाला सुरुवात होईल. तब्बल महिनाभर रंगणा-या या फुटबॉल ‘वर्ल्ड वॉर’मध्ये बाजी मारण्यात तब्बल ३२ संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. गुरुवारी दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर यंदाच्या २१व्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या थराराला सुरुवात होईल.काही तासांवर आलेली विश्वचषक स्पर्धा संस्मरणीय करण्यासाठी यजमान रशिया पूर्णपणे फुटबॉलमय झाले असून ज्या शहरांमध्ये सामने रंगणार आहेत तेथे फुटबॉलप्रेमींचा उत्साह शिगेला पोहचला आहे. रशियातील सर्वच ११ यजमान शहरांमध्ये चाहत्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. एक महिना रंगणाºया या फुटबॉल मेळावाचा पहिला सामना ६० हजार प्रेक्षक क्षमतेच्या लुजनिकी स्टेडियममध्ये खेळविण्यात येईल. यावेळी यजमान रशिया सौदी अरबविरुद्ध दोन हात करेल.त्याचवेळी रशियन नागरिक मोठ्या उत्साहामध्ये विदेशी पाठिराखे आणि पर्यटकांचे स्वागत करत आहेत. एक आठवड्यापूर्वीच दक्षिण अमेरिकेच्या पाठिराख्यांनी एकत्रितपणे रेड स्केअर परिसतात फेरी काढली आणि येथील दुकानदारांसह फोटोही काढले. यावेळी, काही स्थानिक लोकांनी सकारात्मकपणे सर्वांना पाठिंबा देत ‘रुस रुस’ असा नाराही दिला. त्याचवेळी मॉस्कोच्याबाहेर दुसºया शहरांमध्ये हाच उत्साह अधिक दिसून येत आहे. (वृत्तसंस्था)नेमारचा सराव पाहण्यासाठी पोहचले पाच हजार प्रेक्षकब्राझीलच्या संघाने येथे सराव करण्यास सुरूवात केली आहे. पॅरीस सेंट जर्मन संघांचा स्टार नेमार याचा सराव पाहण्यासाठी सोची येथे सुमारे पाच हजार चाहते पोहचले होते.आॅस्ट्रेलियन संघाने सोमवारी कजानमध्ये सराव केला. तेव्हा सुमारे ३२०० लोक सराव पाहण्यास पोहचले होते. प्रशिक्षक बर्ट वान मारविज यांचा संघ कझानमध्ये सराव करत आहे. चाहते त्यावेळी आयोजकांनी दिलेले आॅस्ट्रेलियाचे पिवळ््या आणि हिरव्या रंगाचे झेंडे फडकावत‘ आॅसी, आॅसी गो, गो’ अशा घोषणाही देत होते.रशियात मेस्सी मॅनियानिळ््या रंगाची, सफेद पट्ट्यांची आणि १० नंबरची मेस्सीची जर्सी घातलेले अनेक फुटबॉल चाहते मॉस्कोच्या रस्त्यांवर दिसत आहेत. अर्जेंटिनाचे समर्थक रशियात मोठ्या संख्येने येत आहेत. अर्जेंटिनाच्या संघाने १९९३ मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर संघ अजूनही विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. मॉस्कोतील रेड स्क्वेअरवर अर्जेंटिनाचे चार समर्थक मोठा झेंडा घेऊन फोटो काढत होते. त्या झेंड्यात मेस्सी आणि मॅराडोनाचे फोटो होते. काहीजण अर्जेंटिना, मेस्सी यांच्या घोषणा देत होता.नकारात्मकता सोडा; विश्वचषकाकडे लक्ष्य द्याविश्वचषकाचे यजमानपद सांभाळणा-या रशियातील फुटबॉल समुदायाने खेळाच्या हितधारक आणि जगातील सर्व प्रशंसकांना एक कळकळीचे आवाहन केले आहे की, नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि विश्वचषकाकडे लक्ष द्या. रशिया फुटबॉल संघाचे महासंचालक अलेक्झेंडर अलीवने जगातील प्रशंसकांना अपील केली की, विश्वचषकाला आता सुरुवात होईल. हे एक महत्त्वपूर्ण आयोजन आहे. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा. चला, एकजूट होउन या स्पर्धेला सर्वाेत्तम बनवण्याचा प्रयत्न करुया. आशा आहे की, रशियाचा संघ या विश्वचषकात शानदार प्रदर्शन करील. काही दिवसांपूर्वी मॉस्कोच्या एका विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिसरात फॅन झोन बनविण्यास विरोध केला होता. रशियाकडून सर्वाधिक गोल नोंदवणाºया अलेक्झेंडर केरझाकोवने म्हटले की, चार वर्षांतून एकदा होणाºया या स्पर्धेतून रशियाला आपली प्रतिमा आणखी सुधारण्याची संधी आहे. आम्ही यजमान म्हणून उत्कृष्ट आहोत, हे सिद्ध करण्याची संधी आहे. हा जगातील सर्वांत सुंदर देश आहे. हा बहुराष्ट्रीय आणि बहुजातीय देश आहे.दरम्यान, प्रदर्शन पाहता रशियाकडून मोठी अपेक्षा आहे. मानांकनाच्य्या बाबतीत हा कमजोर संघ आहे.रशिया विश्चचषक स्पर्धेच्या रंगात पूर्णपणे रंगून गेला आहे. कडाक्याच्या थंडीतही येथील नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. रशियामध्ये प्रथमच विश्वचषक होणार असल्यामुळे येथील नागरिक स्टार खेळाडू मेस्सी, नेमार यांना पाहण्यासाठी आसुसलेले आहेत. महिनाभर चालणाºया या स्पर्धेच्या सलामीच्या लढतीसाठी सुमारे ८0 हजार प्रेक्षकांची उपस्थिती असण्याची शक्यता आहे.रशियन नागरिक येथे येणाºया फुटबॉलप्रेमी आणि पर्यटकांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करीत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी टिव्हीवरून देशाला संबोधित करताना म्हटले आहे की, ‘स्पर्धा आयोजनासाठी १३ अरब डॉलर्स खर्च झाले आहेत. त्यामुळे रशियन नागरिकांसह इतर फुटबॉलप्रेमी आणि पर्यटकांना अविस्मरणीय अशी अनुभूती मिळणार आहे. सर्वांनी ही स्पर्धा एका उत्सवाप्रमाणे साजरी करा आणि त्याचा भरपूर आनंद लुटा. ज्यामध्ये जोश आणि जल्लोष भरलेला असेल.’
आजपासून रंगणार विश्वचषक थरार, फुटबॉलप्रेमींची उत्सुकता शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 5:30 AM