मैदानावर अनेक प्रकारचे अपघात घडतात पण आकाशातून वीज पडल्यामुळे खेळाडूचा मृत्यू झाल्याचे तुम्ही कधी पाहिले किंवा ऐकले नसेल. एफएलओ एफसी बांडुंग आणि एफबीआय सुबांग यांच्यातील मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यादरम्यान एका ३५ वर्षीय इंडोनेशियन खेळाडूचा मृत्यू झाला. सोमवारी इंडोनेशियन मीडियामध्ये या दुःखद घटनेची बातमी आली. ही घटना स्टँडवरील एका व्हिडिओमध्ये देखील कैद झाली आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की मैदानावर फुटबॉल खेळत असलेल्या एका खेळाडूवर अचानक वीज पडली आणि काही सेकंदातच खेळाडूचा मृत्यू झाला.
इंडोनेशियातून उघडकीस आलेली ही दुसरी घटना आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अपघातानंतरही खेळाडूचा श्वासोच्छवास सुरू होता, मात्र दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला. यापूर्वी, २०२३ मध्ये सोराटिन अंडर-१३ चषकादरम्यान पूर्व जावाच्या बोजोंगोरो येथे एका तरुण फुटबॉल खेळाडूचा वीज पडून मृत्यू झाला होता. त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि नंतर बोजोनेगोरो येथील इब्नू सिना रुग्णालयात त्याचे निधन झाले.
स्थानिक प्रसारमाध्यमांच्या म्हणण्यानुसार सामना सुरू झाला तेव्हा हवामान स्वच्छ होते, पण कालांतराने ते बिघडले. रेफरीच्या नियमावलीनुसार, हवामानाचा विचार करून सामन्याचे आयोजन करणे ही त्याची जबाबदारी आहे.