कोरोना व्हायरसचं संकट देशात हळुहळू वाढताना दिसत आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत आता सहाव्य स्थानी पोहोचला आहे. काल एका दिवसात जवळपास 9 हजार रुग्ण सापडल्याची नोंद झाली. कोरोनाचा क्रीडा विश्वालाही धक्का दिला आहे. शनिवारी कोरोनामुळे माजी फुटबॉलपटू इलाईदाथ हम्साक्कोया यांचे निधन झाले. श्वसनाची समस्या होत असल्यानं त्यांना बंगळुरू येथील मंजेरी वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते 63 वर्षांचे होते.
हम्साक्कोया दहा दिवसांपूर्वी महाराष्ट्रातून परतले होते आणि तेव्हा त्यांना निमोनीया झाल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकिय अहवालात ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आणि त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर प्लाझमा थेरेपी सुरू होती, परंतु त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आला.
त्यांच्या घरातील सदस्यांनाही कोरोना झाला आहे. त्यांच्या मागे मुलगा, सून आणि दोन नातवंड असा परिवार आहे. केरळमधील कोरोनामुळे झालेला हा 15वा मृत्यू आहे. हम्साक्कोया यांनी महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. शिवाय त्यांनी संतोष चषक स्पर्धेतही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. ते मोहन बगान आणि मोहम्मदीन स्पोर्टींग या क्लबकडूनही खेळले.
विराट कोहलीच्या श्रीमंतीचा थाट; आलिशान बंगला पाहून म्हणाल,'वाह क्या बात है!'
Video: 'लाईव्ह मॅच विथ 3D इफेक्ट'; असा सामना कधी पाहिला नसेल, लागली पैज!
वर्णद्वेशाविरुद्धचा लढा तीव्र होतोय; दिग्गज खेळाडूकडून तब्बल 700 कोटींची मदत!