चिन्मय काळे : फ्रान्सच्या विश्वचषक विजयामुळे त्यांचे प्रशिक्षक दीदीएर डिश्चॅम्प्स यांच्या नावावर आगळ्या विक्रमाची नोंद झाली आहे. प्रशिक्षक व कर्णधार या दोन्ही नात्याने संघाला विजय मिळवून देण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.
जस्ट फॉन्टेन आणि जोसेफ प्लाटिनी यासारख्या मातब्बर खेळाडूंचा इतिहास असतानाही फ्रान्स विश्वचषकाचा दावेदार कधीच मानला जात नव्हता. १९९८ मध्ये ‘मॉडर्न’ श्रेणीतला पहिला फुटबॉल विश्वचषक फ्रान्समध्येच झाला. स्वदेशीयांच्या अपेक्षा घेऊन फ्रान्सचा संघ डिश्चॅम्प्सप यांच्या नेतृत्त्वात मैदानात उतरला होता. प्रत्येक सामना जिंकून फ्रान्सने अंतिम सामन्यात ब्राझिलसारख्या बलाढ्य संघाचा पराभव करीत पहिल्यांदाच विश्वचषकावर स्वत:चे नाव कोरले. फ्रान्सच्या त्या विजयाचे श्रेय डिश्चॅम्प्स यांनाच जाते. यानंतर २० वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी डिश्चॅम्प्स यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या फ्रान्सला मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. दुसºयांना फ्रान्स विश्वचषक विजेता झाला. कर्णधार व प्रशिक्षक या दोन्ही पदी राहून संघाला विजय मिळवून देण्याची ही कामगिरी करणारे डिश्चॅम्प्स हे ब्राझीलचे मारिओ झॅगलो व जर्मनीचे फ्रान्झ बॅनेनबर यांच्यासारखे तिसरे ठरले आहेत.अत्यंत शांत डोक्याचे व तंत्रशुद्ध खेळ पण योग्य वेळी आक्रमण, अशी रणनिती वापरत त्यांनी १९९८ मध्ये ब्राझिलचा ३-० ने पराभव केला होता. तीच रणनिती त्यांनी क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात अवलंबवली व संघाचा विजय झाला.