मॉस्को - विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली तेव्हा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन दिग्गजांच्या नावाचीच चर्चा होती. पण ती बाद फेरीनंतर विरली... रविवारी अंतिम लढतीनंतर फुटबॉल विश्वाला नवा तारा सापडला आहे. उंचीने लहान, पण चपळतेत सर्वांवर भारी असलेल्या फ्रान्सच्या 19 वर्षीय कायलीन मॅबाप्पेची चर्चा सर्वत्र आहे. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत गोल करणारा तो ब्राझिलचे दिग्गज पेले यांच्यानंतर दुसरा युवा खेळाडू ठरला आहे.
France vs Croatia, WC Final Live: रोनाल्डो, मेस्सीपासून सुरू झालेली चर्चा अखेर मॅबाप्पेवर थांबली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 10:51 PM