शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

गोव्यात ब्राझीलला पसंती! रंगणार ब्राझील-नायझेर सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:33 AM

गोव्याप्रमाणेच ब्राझीलवरही पोर्तुगीजांनी राज्य केले. ब्राझील आणि गोवा या दोघांच्या संस्कृतीत बरीच समानता पाहायला मिळते. गोव्यात फुटबॉल हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे.

सचिन कोरडे गोवा : गोव्याप्रमाणेच ब्राझीलवरही पोर्तुगीजांनी राज्य केले. ब्राझील आणि गोवा या दोघांच्या संस्कृतीत बरीच समानता पाहायला मिळते. गोव्यात फुटबॉल हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे ब्राझील आणि फुटबॉल या दोन्ही गोष्टींचा गोमंतकीयांवर बराच प्रभाव आहे.अशातच आपल्या आवडत्या संघाचा खेळ पाहण्याची संधी मिळणे म्हणजे सोन्याहून पिवळे. १७ वर्षांखालील विश्वचषकाच्या निमित्ताने ही संधी मिळणार आहे. ब्राझीलकडे प्रबळ दावेदार म्हणूनही पाहिले जात आहे. येत्या १३ आॅक्टोबर रोजी गोेव्यात ब्राझील-नायझेर हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी हे दोन्ही संघ बुधवारी गोव्यात दाखल झाले. ब्राझील संघ जेव्हा विमानतळाबाहेर पडला तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हजारो चाहते उपस्थित होते. पोर्तुगीज भाषेत ते जयघोष करीत होते. प्रत्येक खेळाडूला निरखता यावे, यासाठी त्यांचा हा प्रयत्न होता. जल्लोषी स्वागताने ब्राझीलच्या खेळाडूंनाही मोठा धक्का बसला. त्यांनी गोमंतकीयांना धन्यवाद दिले.ब्राझील हा गोमंतकीयांच्या सर्वाधिक पसंतीचा संघ आहे.आतापर्यंतची त्यांची कामगिरी पाहता हा संघ आगेकूच करेल, यात शंका नाही. ब्राझीलने स्पेन आणि उत्तर कोरिया संघांवर मात करीत लीगमधील सामने जिंकत अंतिम १६ साठी पात्रता मिळवली आहे. आपले विजयी अभियान कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.पुणे-कोल्हापूरकरांची गोव्याकडे धावमहाराष्ट्र आणि गोव्यातही या स्पर्धेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, ब्राझीलच्या सामन्याचे सर्वाधिक आकर्षण पाहायला मिळत आहे. १३ रोजी होणाºया सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली असून ही तिकिटे मिळवण्यासाठी पुणे आणि कोल्हापूर येथील चाहत्यांनी खूप धडपड केली. जवळपास २००० चाहते कोल्हापूर येथून येतील. गोव्याप्रमाणेच ब्राझील संघ हा कोल्हापूरवासीयांचा आवडता संघ आहे. हा सामना पाहण्यासाठी त्यांना फिफा संघटना व गोवा फुटबॉल असोसिएशनने मदत केली आहे. कोल्हापूरच्या चाहत्यांमध्ये स्थानिक युवा फुटबॉल खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक यांचा समावेश असल्याचे कोल्हापूर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र दळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Footballफुटबॉल