नवी दिल्ली : आशियाई फुटबॉल परिसंघाने १९७९ नंतर प्रथमच भारताला २०२२ च्या आशियाई महिला फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद सोपविले आहे. एएफसी महिला फुटबॉल समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. फेब्रुवारीत ही शिफारस करण्यात आली होती.अ.भा. फुटबॉल महासंघाला पाठविलेल्या एका पत्रात एएफसी महासचिव दाटो विडसर जॉन म्हणाले, ‘२०२२ च्या आशिया चषक महिला फुटबॉलचे यजमानपद भारताला सोपविले आहे.’ स्पर्धेत १२ संघ सहभागी होतील. भारत यजमान असल्याने थेट सहभागी होईल. ही स्पर्धा २०२३ च्या फिफा महिला विश्वचषकाची पात्रता फेरी देखील असेल.भारतात पुढच्यावर्षी १७ वर्षांखालील महिला विश्वचषकाचे देखील आयोजन होणार आहे. (वृत्तसंस्था)‘२०२२ च्या आशिया चषक महिला फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भूषविण्यायोग्य समजल्यामुळे मी आशियाई फुटबॉल परिसंघाचा आभारी आहे. ही स्पर्धा महत्त्वाकांक्षी महिला फुटबॉलपटूंना प्रेरणा देणारी ठरेल. भारतात महिला फुटबॉलमध्ये सामाजिक क्रांती आणणारी ही स्पर्धा असेल.’-प्रफुल्ल पटेल, अध्यक्ष, एआयएफएफ
४३ वर्षांनंतर मिळाले यजमानपद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 5:02 AM