शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
2
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
3
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
5
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
6
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
8
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
9
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
10
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
11
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
12
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
13
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
14
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
15
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
16
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
17
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
18
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
19
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
20
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा

होऊ दे खर्च! 'Honeymoon'साठी स्टार खेळाडूनं गाठलं थेट मालदीव, हॉटेल भाडं ऐकून व्हाल थक्क!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 1:30 PM

मालदीव हे निसर्गसंपन्नतेनं नटलेलं ठिकाण, त्यामुळे नवीन असो किंवा जुनं झालेलं जोडपं, मालदीवमध्ये हनिमूनसाठी जाण्यास तत्पर तयार असतात.. असंच एक जोडपं सध्या मालदीवमध्ये आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून विश्रांतीवर आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी अजून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आगामी इंडियन प्रीमिअर लीगमधील कामगिरीच्या जोरावर त्याचे टीम इंडियातील पुनरागमन अवलंबून आहे. त्यामुळे आयपीएलपूर्वी धोनी कुटुंबीयांसोबत मालदीव येथे सुट्टी एंजॉय करताना दिसत आहे. सोशल मीडियावर धोनीच्या मालदीव ट्रीपचीच चर्चा आहे. पण, मालदीवमध्ये एका स्टार खेळाडूच्या दुसऱ्या हनिमूनची चर्चा सुरू झाली आहे.

इंग्लिश प्रीमिअर लीगमधील मँचेस्टर युनायटेड क्लबचा स्टार खेळाडू फ्रेड्सनं जानेवारी महिन्यात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. त्यानंतर फ्रेड्स त्याच्या पत्नीसह सुट्टीवर गेला आहे. 17 फेब्रुवारीला चेल्सी क्लबविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी तो पुन्हा मैदानावर उतरणार आहे. तोपर्यंत तो त्याचा हनिमुन एंजॉय करत आहे.   

फ्रेड्स आणि त्याची पत्नी मोनिक्यू मालदीव येथे हनिमूनसाठी गेले आहेत. हनिमूनसाठी या कपलनं अथांग निळ्याशार समुद्रात एक प्रायव्हेट व्हिला बूक केला आहे. या व्हिलाला स्वतंत्र किनारा आहे, वर्लपूल, बार आणि दोन स्वीमिंग पूल आहेत. अशा या आलीशान व्हिलात फ्रेड्स त्याचा हनिमून साजरा करत आहे.  फ्रेड्स आणि मोनिक्यू यांनी 2018मध्ये लग्न केलं.  आता हे कपल हनिमूनसाठी ज्या व्हिलामध्ये थांबले आहेत त्याचं भाड ऐकून तुम्हाला चक्कर नक्की येईल. ब्राझीलचा हा फुटबॉलपटूनं या व्हिलामधील एका रात्रीसाठी 3,500 पाऊंड म्हणजेच जवळपास सव्वा तीन लाख रुपये मोजत आहे.   

कोण आहे हा फ्रेड ?फ्रेडरीको रॉड्रीगेज असे या खेळाडूचे नाव आहे. इंग्लिश प्रीमिअर लीगमधील मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये मध्यरक्षक म्हणून तो खेळतो. 2015च्या कोपा अमेरिका स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या ब्राझीलच्या संघात त्याला स्थान देण्यात आले होते. त्यानंतर 2018च्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या संभाव्य 23 खेळाडूंमध्येही त्याचा समावेश होता. 

 

टॅग्स :FootballफुटबॉलMS Dhoniमहेंद्रसिंग धोनीMaldivesमालदीव