मुंबई - कर्णधार सुनील छेत्रीने नोंदवलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात केनियाचा २-० असा पराभव करत इंटरकॉन्टिनेंटल चषकावर नाव कोरले. छेत्रीने या दोन गोलाच्या जोरावर सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. तसेच, त्याने याबाबतीत अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सी याचीही बरोबरी केली.
या दोन्ही दिग्गज फुटबॉलपटूंच्या नावावर प्रत्येकी 64 गोलची नोंद झाली आहे. 102 व्या सामन्या छेत्रीने 64 वा गोल केला आहे. अव्वल स्थानी पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो असून त्याने 150 सामन्यांतून 81 गोल केले. देशासाठी सर्वाधिक गोल करणा-यांच्या एकूण क्रमवारीत मेस्सी व छेत्री संयुक्तपणे 21व्या स्थानी आहेत.
इंटरकॉन्टिनेंटल चषकातील चार सामन्यात भारताचे एकूण 11 गोल झाले त्यापैकी 8 गोल एकट्या छेत्रीने केले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला इंटरकॉन्टिनेंटल कप 2018 स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.