कोलकाता : १७ वर्षाआतील फुटबॉल विश्वचषकात ग्रुप ई मध्ये शनिवारी येथे जापान विरुद्ध न्यू कॅलेडोनिया असा सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी जापानचा संघ प्रयत्नशील असेल.जापानला गेल्या सामन्यात फ्रान्सकडून १-२ ने पराभव पत्करावा लागला होता. जापानने पहिल्या सामन्यात होंडुरसवर ६-१ असा विजय मिळवला. त्यात स्ट्रायकर किएटो नाकामुराच्या हॅट्ट्रिकचा समावेश आहे. न्यू कॅलेडोनियाच्या संघाने स्पर्धेत दोन सामन्यात १२ गोल गमावले आहेत. त्यात फ्रान्सच्या विरोधातील दोन आत्मघाती गोलचा समावेश आहे.फ्रान्सच्या विरोधात न्यू कॅलेडोनियाला ७-१ असा पराभव पत्करावा लागला. संघाकडून एकमेव गोल सिंद्री वांडेगेस याने केला. होंडुरसविरोधात संघाला ५-० ने पराभव पत्करावा लागला. आठ वेळा या स्पर्धेत सहभागी झालेला जापानचा संघ न्यू कॅलेडोनियाविरोधात स्टार खेळाडूंना आराम देऊ शकतो. हा सामना सायंकाळी पाच वाजता होईल.इराकचे लक्ष्य बाद फेरीवर-शानदार फॉर्ममध्ये असलेला इराकचा संघ येथे ग्रुप एफमध्ये शनिवारी इंग्लंडविरोधात खेळेल. त्या वेळी इराकचे लक्ष्य इंग्लंडवर विजय मिळवून बाद फेरी गाठण्याचे असेल. इराकने बाद फेरी गाठल्यास तो इतिहास ठरेल.दुसºयांदा स्पर्धा खेळणाºया इराकने आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मेक्सिकोला १-१ असे बरोबरीत रोखले. त्यानंतर चिलीला ३-० ने पराभूत करत बाद फेरीतील जागा जवळपास नक्की केली आहे.इंग्लंडदेखील अंतिम १६ मध्ये पोहचू शकतो. इराकला पुढच्या फेरीत पोहचण्यासाठी फक्त एका ड्रॉची गरज आहे. इराकने विजय मिळवल्यास संघ ग्रुपमध्ये अव्वल स्थानी पोहचेल. इराकसाठी मोहम्मद दाऊद याने तीन गोल केले आहेत.
बाद फेरीसाठी लढणार जापान, कमजोर न्यू कॅलोडेनियाचा धुव्वा उडवण्यास सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 2:28 AM