शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

झारखंडच्या मुलीची फुटबॉलमध्ये छाप, मुंबईतील शिबिरात उमटवला ठसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 04:20 IST

महिला सक्षमीकरण किंवा मुलींच्या शिक्षण जागृतीसाठी कितीही उपक्रम आज देशभरात सुरू असले, तरी भारतातील काही भागांत आजही मुलींना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य नाही. चर्चगेट येथील वायएमसीए मैदानावर सुरू असलेल्या फुटबॉल शिबिरामध्ये सहभागी झालेल्या झारखंडच्या नीता कच्चप हिच्याशी संवाद साधल्यानंतर हीच बाब पुढे आली.

मुंबई : महिला सक्षमीकरण किंवा मुलींच्या शिक्षण जागृतीसाठी कितीही उपक्रम आज देशभरात सुरू असले, तरी भारतातील काही भागांत आजही मुलींना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य नाही. चर्चगेट येथील वायएमसीए मैदानावर सुरू असलेल्या फुटबॉल शिबिरामध्ये सहभागी झालेल्या झारखंडच्या नीता कच्चप हिच्याशी संवाद साधल्यानंतर हीच बाब पुढे आली.झारखंडच्या ओर्मांची जिल्ह्यातील असलेली नीता फुटबॉलच्या निमित्ताने पहिल्यांदाच जिल्ह्याबाहेर पडली. मायानगरी म्हणून ओळख असलेल्या मुंबईचा झगमगाट तिने पहिल्यांदाच अनुभवला. मात्र, यासाठी तिला कठोर मेहनतीशिवाय गावकºयांच्या टीकेलाही सामोरे जावे लागले. नीताला फुटबॉलची प्रचंड आवड. पण फुटबॉल खेळताना परिधान कराव्या लागणाºया कपड्यांमुळे गावकºयांच्या टीकेला तिला सामोरे जावे लागायचे. त्यामुळे ती स्पर्धात्मक स्तरापर्यंत खेळू शकत नव्हती.मुंबईस्थित आॅस्कर फाउंडेशनने घेतलेल्या ‘किक लाइक अ गर्ल’ या विशेष शिबिरामध्ये सहभाग घेतल्यानंतर मात्र नीताच्या फुटबॉल वेडाला योग्य दिशा मिळाली. दोन वर्षांपासून फुटबॉलचे प्रशिक्षण घेत असलेली नीता आज तिच्या गावातील युवापिढीसाठी एक आदर्श बनली असून अनेक मुली तिच्याप्रमाणेच फुटबॉलमध्ये करिअर घडवण्यास उत्सुक असल्याची माहिती आॅस्कर फाउंडेशनने दिली.मला फुटबॉल खेळायचे होते, पण मुलांप्रमाणे शॉटर््स घालून खेळावे लागत असल्याने गावकºयांच्या टीकेला सामोरे जावे लागत होते. ‘तू मुलांप्रमाणे शॉटर््स घालून कशी खेळू शकते?’ यासारख्या अनेक प्रश्नांनी मला भंडावून सोडले होते. पण आॅस्कर फाउंडेशनच्या शिबिराने आत्मविश्वास मिळवून दिल्यानंतर मी गावकºयांची मानसिकता बदलू शकले.- नीता कच्चप

टॅग्स :Footballफुटबॉल