इंग्लंडफुटबॉल संघाचा गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्ड यानं नुकताच बालपणीची मैत्रिण मीगन डेव्हीसन हीच्याशी विवाह केला. अगदी साधेपणात या दोघांनी रजिस्टार ऑफिस जाऊन विवाह केला. साधी जीन्स, टी शर्ट आणि टोपी घालून पिकफोर्ड रजिस्टार ऑफिसमध्ये पोहोचला. मीगननेही सिंपल पेहरावा केला होता. 2018च्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत पिकफोर्ड आणि मीगन यांचे 'KISS' प्रकरण चांगले गाजले होते. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. साधेपणात लग्न केल्यानंतर हे नव दाम्पत्य हनिमून टूरला गेले आणि त्यांच्या लग्नाची चर्चा सोडून सर्व जण आता टूरची चर्चा करत आहेत. त्याला कारणही तसंच आहे.
प्रीमिअर लीग फुटबॉलमध्ये आठवड्याला 1 लाख पाऊंड म्हणजेच एक कोटी कमावतो. त्यामुळे लग्नानंतर त्यानं पत्नीसाठी बूक केलेली हनिमून टूरही तितकीच महागडी असेल यात शंका नाही. पिकफोर्ड आणि मीगन हे प्रायव्हेट जेटनं जगभरात भटकंती करायला निघाले आहेत. सध्या हे नव दाम्पत्य दुबईत आहेत आणि ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, त्या हॉटेलच्या रूमचे एका दिवसाचे भाडे हे जवळपास अडीच लाख रुपये आहे.
होऊ दे खर्च! 'Honeymoon'साठी स्टार खेळाडूनं गाठलं थेट मालदीव, हॉटेल भाडं ऐकून व्हाल थक्क!!इंग्लिश प्रीमिअर लीगमधील मँचेस्टर युनायटेड क्लबचा स्टार खेळाडू फ्रेड्सनं जानेवारी महिन्यात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. त्यानंतर फ्रेड्स त्याच्या पत्नीसह सुट्टीवर गेला आहे. फ्रेड्स आणि त्याची पत्नी मोनिक्यू मालदीव येथे हनिमूनसाठी गेले आहेत. हनिमूनसाठी या कपलनं अथांग निळ्याशार समुद्रात एक प्रायव्हेट व्हिला बूक केला आहे. या व्हिलाला स्वतंत्र किनारा आहे, वर्लपूल, बार आणि दोन स्वीमिंग पूल आहेत. अशा या आलीशान व्हिलात फ्रेड्स त्याचा हनिमून साजरा करत आहे. फ्रेड्स आणि मोनिक्यू यांनी 2018मध्ये लग्न केलं. आता हे कपल हनिमूनसाठी ज्या व्हिलामध्ये थांबले आहेत त्याचं भाड ऐकून तुम्हाला चक्कर नक्की येईल. ब्राझीलचा हा फुटबॉलपटूनं या व्हिलामधील एका रात्रीसाठी 3,500 पाऊंड म्हणजेच जवळपास सव्वा तीन लाख रुपये मोजत आहे.