शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
3
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
5
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
6
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
7
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
8
‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग
9
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
10
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
11
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
12
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
13
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
14
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
15
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
16
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
18
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
19
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
20
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!

INDIA VS IRAQ : भारताकडून पंचांनी विजय हिरावून घेतला, इराकने ७ पेनल्टी किकवर सामना जिंकला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 6:17 PM

KING'S CUP 2023, INDIA VS IRAQ - किंग्स कपच्या उपांत्य फेरीतील सामन्यात इराकने रोमहर्षक सामन्यात भारतावर २-२ ( ५-४) असा पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवला.

KING'S CUP 2023, INDIA VS IRAQ - किंग्स कपच्या उपांत्य फेरीतील सामन्यात इराकने रोमहर्षक सामन्यात भारतावर २-२ ( ५-४) असा पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवला. भारताला किंग्स कपच्या फायनलमध्ये प्रथमच धडक देण्याची संधी होती अन् त्यांनी आघाडीही घेतली होती. परंतु दोन्ही वेळेस इराकला पेनल्टी किक मिळाली अन् त्यांनी निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत सोडवला. पेनल्टी शूटआऊटमध्ये मात्र भारताला हार मानावी लागली. फर्नांडेसचा चुकलेला पहिला प्रयत्न भारताला महागात पडला. निर्धारित वेळेत इराकला मिळालेले दोन्ही पेनल्टी या वादात अडकल्या आहेत. रेफरीने भारतीय संघावर अन्याय केल्याची चर्चा आहे. 

भारत-इराक यांच्यात पहिल्या हाफमध्ये १-१ अशी बरोबरी. महेश नाओरेम सिंगने १६व्या मिनिटाला मिळवून दिली होती आघाडी. २८व्या मिनिटाला पेन करिमने इराकसाठी बरोबरीचा गोल केला. दुसऱ्या हाफमध्ये आकाश मिश्राने मारलेला चेंडू इराकचा गोलरक्षक जला हसनने रोखला, परंतु त्यावर नियंत्रण राखण्यात तो अपयशी ठरला. चेंडू गोलजाळीत विसावला आणि भारताला २-१ अशी आघाडी मिळाली. ७२व्या मिनिटाला गुरप्रीत सिंग संधूने अप्रतिम बचाव करून इराकला पुन्हा बरोबरी मिळवू दिली नाही. भारताचा बचावही भक्कम होता आणि त्यांनी इराकचे प्रयत्न हाणून पाडले होते. 

८०व्या मिनिटाला इराकला पेनल्टी मिळाली. निखिल पुजारी आणि संदेश झिंगान यांनी इराकच्या खेळाडूा पेनल्टी क्षेत्रात पाडले. आयमन हुसेनने इराकसाठी बरोबरीचा गोल केला. ८४व्या मिनिटाला हुसेन तिसऱ्या गोलच्या अगदी जवळ पोहोचला होता, परंतु त्याचा हेडर चुकला अन् गुरप्रीतने चांगला बचाव केला. त्यामुळे हलबल झालेल्या इराकच्या खेळाडूने ९०+३ मि. राग काढला. इक्बालने भारताच्या फर्नांडेसच्या चेहऱ्यावर कोपरा मारला अन् रेफरीने लगेच त्याला रेड कार्ड देऊन बाहेर केले. निर्धारित वेळेत २-२ अशा बरोबरीमुळे सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. 

पेनल्टी शूटआऊट...- ब्रेंडन फर्नांडेसचा पहिला गोल पोस्टला लागून अयशस्वी ठरला- इराकच्या मेर्चास डोस्कीने गोल करून आघाडी घेतली, गुरप्रीतने अडवण्याचा पुर्ण प्रयत्न केला.- संदेशन झिंगनने चतुराईने गोल करून भारताचे खाते उघडले- अली अदनानने सहज गोल करून इराकची आघाडी २-१ अशी मजबूत केली- भारताच्या सुरेश वांगजामने गोल केला अन् सामना २-२ असा बरोबरीत आला- आयमन हुसेनने गुरप्रीतला चकवले अन् इराकला पुन्हा ३-२ अशा आघाडीवर आणले- भारताकडून अन्वर अलीने गोल केला, अल हमावीने इराकला ४-३ असे पुढे नेले- रहिम अलीने ४-४ अशी बरोबरी मिळवली अन् आता गुरप्रीतवर सर्व मदार होती- इराकच्या बाशर रसान बोन्यानने गोल करून इराकचा २-२ ( ५-४) असा विजय पक्का केला.  

 

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारत