ठळक मुद्देफुटबॉल स्पर्धा सुब्रतो मुखर्जी चषक
लोणी : पुणे बालेवाडी क्रीडानगरीत झालेल्या १७ वर्षाखालील मुलींच्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेत लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या संघाने पुणे विभागाचे नेतृत्व करताना विजेतेपद पटकाविले. हा संघ आता दिल्ली येथे होणाºया राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील आठ विभागातील संघ सहभागी झाले होते. पुणे विभागाचे नेतृत्व करीत असलेल्या प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या खेळाडूंचा पहिला सामना लातूर विभागाशी झाला. लातूर विभागाचा ९-० असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत या संघाने अटीतटीच्या सामन्यात अमरावती विभागाच्या संघाला ३-२ ने पराभव करीत अंतिम फेरीत अप्रतिम खेळ करून बलाढ्य मुंबईच्या संघाचा ४-१ असा पराभव केला. या सामन्यात पूजा काळे, ज्ञानेश्वरी मडके, श्रृती मेखे यांनी गोल नोंदविले. भाग्यश्री लोकरे(गोलकिपर) सई काळे,राणी कदम, दिव्या खताळ, प्रांजली नांगरे, क्षितिजा वराळ, संजना ढाले, अदिती नाईक यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या संघात स्नेहल कळमकर, किर्ती गोसावी, साक्षी बने, प्रतीक्षा वरखेडे यांचा समावेश असून हा संघ १ ते ५ सप्टेंबरदरम्यान नवी दिल्ली येथे होणाºया राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. या खेळाडूंना प्राचार्या लिलावती सरोदे, क्रीडा शिक्षिका विद्या गाढे, कल्पना कडू, घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूंना डॉ. सुजय विखे यांनी शुभेच्छा देऊन प्रोत्साहन दिले. ‘प्रवरा कन्या’ कडे राज्याचे नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 7:02 PM