पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियाना रोनाल्डो ( Cristiano Ronaldo) हा इंग्लिश प्रीमिअर लीगमधील ( EPL) त्याच्या पूर्वाश्रमिच्या क्लबमध्ये परतला आहे. ३६ वर्षीय रोनाल्डोनं २००३ ते २००९ या कालावधीत मँचेस्टर युनायटेडसाठी २९२ सामन्यांत ११८ गोल्स केले आहेत. मँचेस्टर युनायटेडनं सोशल मीडियावर ही घोषणा केली अन् बघताबघता त्यांच्या या पोस्टनं वर्ल्ड रिकॉर्डची नोंद केली. रोनाल्डोच्या आगमनाच्या त्या पोस्टला आतापर्यंत १ कोटी २९ लाख ७,०२२ लाईक्स मिळाले आहेत ( The announcement of Cristiano Ronaldo return by Manchester United on Instagram garnered 12,907,022 likes as of now) एखाद्या क्लबच्या इंस्टाग्राम पोस्टला मिळालेले हे सर्वाधिक लाईक्स आहेत. याआधी अर्जेंटिनाचा लिओनेस मेस्सीच्या स्वागताची पोस्ट पॅरीस सेंट जर्मेन क्लबनं केली होती आणि त्याला ७८ लाख १९,०८९ लाईक्स मिळाले होते. ( Paris Saint-Germain's Lionel Messi announcement video on Instagram had attracted 7,819,089 likes.)
इंस्टाग्रामवर सर्वाधिक लाईक्स मिळालेल्या पाच पोस्ट
- कोपा अमेरिका चषकासह लिओनेल मेस्सी ( Lionel Messi with Copa America trophy) - ११ जुलै २०२१मध्ये लिओनेल मेस्सीनं त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कोपा अमेरिका २०२१ चषकासह फोटो पोस्ट केला होता. अर्जेंटिनानं अंतिम सामन्यात ब्राझिलला नमवून २८ वर्षांनंतर कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली. मेस्सीचे हे अर्जेंटिनाकडून पहिलेच आंतरराष्ट्रीय जेतेपद आहे आणि त्याच्या या पोस्टला २ कोटी १९ लाख ३५,२७३ लाईक्स मिळाले होते. एखाद्या खेळाडूच्या पोस्टला मिळालेले हे सर्वाधिक लाईक्स आहेत
- ख्रिस्तियानो रोनाल्डोनं वाहिली दिएगो मॅराडोना यांना श्रद्धांजली ( Cristiano Ronaldo's tribute to Diego Maradona) - अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे २५ नोव्हेंबर २०२०ला निधन झाले. रोनाल्डोनं त्यांच्यासोबतचा जुना फोटो पोस्ट केला आणइ त्याला १ कोटी ९८ लाख ७८,७१७ लाईक्स मिळाले होते.
- लिओनेल मेस्सीनं वाहिली मॅराडोना यांना श्रंद्धाजली ( Lionel Messi's tribute to Diego Maradona) - मेस्सीच्या त्या पोस्टला १ कोटी ६४ लाख ०८,४५८ लाईक्स मिळाले.
- लेब्रोन जेम्स याची कोब ब्रायंटला श्रंद्धांजली ( LeBron James' tribute to Kobe Bryant) - अमेरिकेचा दिग्गज बास्केटबॉल कोब ब्रायंट याचे २६ जानेवारी २०२०ला निधन झाले. त्याचा LA Lakers क्लबमधील सहकारी लेब्रोन जेम्स यानं केलेल्या पोस्टला १ कोटी ५३ लाख ७४,५७२ लाईक्स मिळाले.
- कोब ब्रायंट याची अखेरची इंस्टाग्राम पोस्ट ( Kobe Bryant's last Instagram post before his death) - कोब ब्रायंट याच्या अखेरच्या पोस्टला १ कोटी ४४ लाख ४८,०४० लाईक्स मिळाले.