मुंबई : जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या तुलनेत नेहमीच अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी व पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यात अनेकदा कडवी स्पर्धा रंगली. केवळ सर्वोत्तम खेळाडूच नाही, तर सर्वाधिक फॅन फॉलोइंग, सर्वाधिक पुरस्कार, सर्वाधिक गोल अशा विविध गोष्टींमध्येही या दोन स्टार्समधील चढाओढ पाहण्यास मिळते. मात्र, आता, मासिक वेतनाच्या बाबतीत मात्र मेस्सीने रोनाल्डोसह सर्वच खेळाडूंना मागे टाकले असून, तो दर महिन्याला तब्बल ६७ करोड रुपये इतके मासिक वेतनासह सर्वाधिक वेतन घेणारा फुटबॉलपटू ठरला आहे.महिन्याला गलेलठ्ठ पगार घेण्यात मेस्सीने रोनाल्डोसह, फ्रान्सचा अँटोनी ग्रीझमन, ब्राझीलचा नेमार या स्टार्सना मागे टाकले. एका वृत्तसंकेस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, मेस्सीची एका महिन्याची कमाई ८३ लाख यूरो म्हणजेच सुमारे ६७ करोड रुपये इतकी आहे. त्याच वेळी यानंतर युवेंट्स क्लबकडून खेळणारा स्टार रोनाल्डोचा क्रमांक असून, त्याचे मासिक उत्पन्न ४७ लाख यूरो (सुमारे ३८ करोड रुपये) इतकी आहे. विश्वविजेत्या फ्रान्सचा स्टार खेळाडू ग्रीझमन महिन्याला ३३ लाख यूरोची कमाई करत असून, तो या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी आहे.अव्वल १० खेळाडू (किंमत करोड रुपयांमध्ये)लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) 67 करोडख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) 38 करोडअँटोनी ग्रीझमन (फ्रान्स, ३३ करोड), नेमार (ब्राझील, २४ करोड), लुईस सुआरेझ (उरुग्वे, २३ करोड), गेराथ बेल (वेल्स, २० करोड), फिलिप कॉन्टिन्हो (ब्राझील, १८ करोड), एलेक्सिस सँचेजेस (चिली, १८ करोड), कायलियन एम्बापे (फ्रान्स, १४ करोड). मेसुत ओझिल (जर्मनी, १३ करोड)
मेस्सी महिन्याला कमवतो ६७ कोटी रुपये; सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉलपटू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 12:47 AM