ब्युनास आयर्स : त्याला ‘बालपणी’ बुटका..., बुटका...,असे मित्र डिवचायचे. पण अपमान गिळून फुटबॉल मैदानावर यशोशिखरे पादाक्रांत करणारा लियोनेल मेस्सी दीड दशकात चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. आपल्या आवडत्या क्लबसाठी त्याने नवनवे विक्रम नोंदविले. पण अर्जेंटिनासाठी अद्याप विश्वचषक जिंकू न शकल्याची खंत मनात कायम आहे. रशियात १४ जूनपासून सुरू होत असलेल्या या महाकुंभाचे जेतेपद मेस्सी मिळवून देणार का, हा प्रश्न आहे. मायदेशासाठी जेतेपदाचा दुष्काळ संपविण्याची मेस्सीला ही अखेरची संधी असेल.विक्रमी पाच वेळा फिफाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू,विक्रमी पाचवेळा युरोपियन गोल्डन शूज विजेता, बार्सिलोनासाठी नऊवेळा ला लीगा चषक विजेता, चार वेळा यूएफा चॅम्पियन्स लीग आणि सहावेया कोपा डेल रे जेतेपद मिळवून दगणाऱ्या शानदार ‘प्ले मेकर’ला देशासाठी मात्र विशवचषक जिंकता अलोला नाही. क्लबसाठी त्याने ६०० गोल नोंदविले आहेत. त्याने अखेरच्या प्रयत्नांत तरी विश्वचषक जिंकून द्यावा, अशी कोट्यवधी चाहत्यांची इच्छा आहे.याच महिन्यात मेस्सीचा वाढदिवस येतो. १९८७ साली अर्जेंजटिनातील एका गरीब कुटुंबात या शहनशाहचा जन्म झाला. त्याचे वडील कारखान्यात कामगार होते.आई क्लीनरचे काम करायची. फुटबॉलचे वेड मेस्सीला बालपणापासूनच लागले.बालपणी तो बुटका वाटायचा. त्याच्यावर महागडे उपचार करण्यास अनेकांनी असमर्थता दाखविली. बार्सिलोना क्लबने मात्र मदतीचा हात दिला. २००० मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी मेस्सी वडिलांसोबत फुटबॉल चाचणी देण्यासाठी आला. त्यावेळी त्याच्या बुटकेपणाची अनेक खेळाडूंनी खिल्ली उडविली होती. चाचणीत दहा मिनिटांचा खेळ पाहताच बार्सिलोनाने मेस्सीसोबत कराराचा निर्णय घेतला. तेव्हापासून तो क्लबमध्ये कायम आहे. अनेकदा मेस्सी बार्सिलोना सोडणार अशा बातम्या प्रकाशित झाल्या, पण या केवळ वावड्या असल्याचे खुद्द मेस्सीनेच स्पष्ट केले.बार्सिलोनासह केलेल्या करारापोटी मिळालेल्या पैशातून मेस्सीने स्वत:वर यशस्वी उपचार करून घेतले. त्याचे सहकारी आंद्रियास एनिएस्ता, जावी, सॅम्युअल इतो आणि थियरी हेन्री यांनी बार्सिलोनाला अभूतपूर्व यश मिळवून दिले. क्लबला मिळालेल्या यशासोबतच मेस्सीची ख्याती जगभर पसरली. चाहते त्याला मॅरेडोनाचा पर्याय मानू लागले. फरक इतकाच की मॅरेडोनाने विश्वचषकात १९८६ मध्ये अजोंटिनाला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते.मेस्सी २००६, २०१०, २०१४ च्या विश्वचषकात देशासाठी सरस कामगिरी करण्यात अपयशी ठरला. २००६ मध्ये १८ व्या वर्षी अनेकदा तो बाकावर बसून होता. २०१० मध्ये त्याला एकही गोल नोंदविता आला नाही. दोन्हीवेळा उपांत्यपूर्व सामन्यात जर्मनीकडून संघ पराभूत झाला. चार वर्षांआधी जेतेपदापासून एक पाऊल दूर असलेल्या मेस्सीचे स्वप्न ब्राझीलने भंगविले होते. यंदा पराभवाची परतफेड करण्याची मेस्सीकडे संधी असेल. ‘मेस्सी केवळ बार्सिलोनाचा महानायक आहे, अर्जेंटिनाचा नव्हे,’ अशी टीका करणाºयांची तोंडे बंद होऊ शकतील.पात्रता फेरीपासून एकट्याच्या बळावर मेस्सीने देशाला मुख्य फेरी गाठून दिली. पात्रता फेरीत आठ सामन्यात तो बाहेर होता. तेव्हा अर्जेंटिनाचे ७ गुण होते. नंतर त्याने दहा सामन्यात २१ गुण मिळवून दिले. अर्जेंटिना विश्वचषक जिंकण्यात अपयशी ठरला तरी मेस्सीवर प्रश्न करता येणार नाही.ऐतिहासिक ‘गोल नेट’ची होणार विक्रीविश्व चषक २०१४ मध्ये जर्मनीकडून उपांत्य फेरीत ब्राझीलला ७-१ असा पराभव पत्करावा लागला होता. त्या सामन्यात वापरली गेलेली गोल नेट ब्राझील चॅरिटीसाठी विकणार आहे. मिनेइराओ स्टेडिअमने सांगितले की त्या गोल जाळीचे ८१५० तुकडे करून आॅनलाईन विकले जातील. प्रत्येक तुकड्याची किंमत ७१ युरो असेल. एक नेट येथेच ठेवली जाईल तर दुसरी विकली जाणार आहे.ब्राझीलच्या दानी अल्वेसवर शस्त्रक्रियागुडघ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकामधून बाहेर पडलेल्या दानी अल्वेस याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. ब्राझीलचा संरक्षक असलेल्या अल्वेस याला आठ मे रोजी फ्रेंच कपच्या अंतिम सामन्यात दुखापत झाली होती. अल्वेस हा दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. पॅरीस सेंट जर्मेन क्लबने सांगितले की,‘ आम्ही शस्त्रक्रियेसाठी योग्य वेळी वाट पाहत होतो. त्यामुळे तो लवकर तंदुरुस्त होईल.’रशिया संघाचे बरोबरीवर समाधानविश्व कपचा यजमान रशियन संघाचा फॉर्म खराब कायम आहे. रशियाने तुर्की विरोधात सराव सामन्यात १ -१ असा ड्रॉ खेळला. रशियाच्या संघाचा फॉर्म पाहता पुढच्या अठवड्यात सुरू होणाºया स्पर्धेतील संघाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मेस्सी विश्वचषक जिंकणार? अर्जेंटिनासाठी जेतेपदाचा दुष्काळ संपविण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 3:09 AM