नवी दिल्ली : १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची तयारी जवळपास पूर्ण झाली असून स्थानिक आयोजन समितीकडे (एलओसी) पुढील आठवड्यात स्टेडियम सोपविण्यात येतील. २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान अंतिम क्षणी स्टेडियमच्या तयारीबाबत झालेली अफरातफर पुन्हा पाहायला मिळणार नाही, असा विश्वास अधिका-यांनी व्यक्त केला. २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान तयारीला उशीर झाला होता. मात्र, फिफा विश्वचषक स्पर्धा आयोजन समितीचे संचालक झेवियर सेप्पी यांच्यानुसार या स्पर्धेची तयारी वेळापत्रकानुसारच होत आहे. ते म्हणाले, ‘गेल्या तीन वर्षांपासून आम्ही या स्पर्धेची तयारी करत आहोत. ज्यात राज्य आणि केंद्र सरकारचाही समावेश आहे. येथे अंतिम क्षणी तयारीची भूमिका असते असे आम्ही समजत होतो. मात्र, सुदैवाने या स्पर्धेवेळी असे काही घडण्यासारखे नाही.’ तसेच, ‘आम्ही तयारीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. कार्यक्रमानुसार, सर्व स्टेडियम स्पर्धा सुरू होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी स्थानिक आयोजन समितीकडे सोपविण्यात येतील, असेही सेप्पी म्हणाले. (वृत्तसंस्था)
पुढील आठवड्यात स्टेडियम ‘एलओसीकडे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 1:18 AM