रिया दी जानिरो : सर्वात महागडा फुटबॉलपटू म्हणून सध्या ब्राझीलच्या नेयमारचे नाव घेतले जाते. सध्याच्या घडीला नेयमार जायबंदी आहे. तीन महिने तो मैदानात उतरू शकत नाही. पण तरीही तो सध्या टीकेचा धनी ठरतोय. ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना नेयमारने श्रद्धांजली दिली, पण त्याची श्रद्धांजली देण्याचा पद्धत मात्र चुकली. त्यामुळे समाजमाध्यमांवर नेयमार टीकेचा धनी ठरत आहे.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. केंब्रिज येथील राहत्या घरी हॉकिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हॉकिंग यांनी आपल्या दुर्धर अशा आजारपणावर मात करत विज्ञान विषयात महत्त्वपूर्णय योगदान दिले. त्यामुळे अनेकांसाठी ते एक आदर्श होते. त्यामुळे जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत होती. नेयमारनेही यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहिली, पण त्याला कदाचित श्रद्धांजली कशी वाहतात, हे त्याला समजले नसावे.
काही दिवसांपूर्वी नेयमारच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. त्याची ही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची आहे की, त्याला सध्या व्हीचलेअरवर रहावे लागत आहे. त्यामुळे व्हीचलेअरवर बसून त्याने हॉकिंग यांना श्रद्धांजली दिली. पण श्रद्धांजली वाहताना नेयमार हसत होता. त्यामुळे त्याच्यावर चहूबाजाने होत आहे.
नेयमारवर ट्विटरवर टीका करताना एका व्यक्तीने म्हटले आहे की, " नैतिकता, शिष्टाचार आणि सहानुभूती या गोष्टी नेयमारला कळत नाहीत का?कारण श्रद्धांजली वाहताना आपण कसे राहायला हवे, ते त्याला कळलेले नाही. त्यामुळे त्याची छबी खराब होऊ शकते. "