भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येतेय... ब्राझिलियन सुपर स्टार नेयमार ( Neymar) याला प्रत्यक्ष खेळताना पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे आणि त्यासाठी त्यांना पुण्यात यावे लागणार आहे. आगामी AFC चॅम्पियन्स लीगचा ( AFC Champions League) ड्रॉ आज जाहीर झाला.. नेयमार किंवा पोर्तुगालचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यापैकी एक नक्की भारतात येईल, याची खात्री फुटबॉल फॅन्सना होती. रोनाल्डो आला असता तर त्यांच्या आनंदासमोर गगन ठेंगणे पडले असते, परंतु त्यांना नेमयारचा खेळ नक्की पाहता येणार आहे.
९०० कोटी पगार, २५ बेडरूमचं घर अन्... ! नेयमारला बम्पर ऑफर
एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये मुंबई सिटी एफसी ( Mumbai City FC) हा क्लब भारताचे प्रतिनिधित्व करतोय आणि १९ सप्टेंबरपासून ही लीग सुरू होणार आहे. मुंबई सिटी एफसीला D गटात स्थान मिळाले आहे आणि त्यांच्यासमोर सौदी अरेबियाचा एल हिलाल, इराणचा एफसी नासाजी मझांदरन आणि उजबेकिस्तानचा नवबाहोर या क्लबचे आव्हान आहे. या चार संघांना आज D गटात स्थान मिळाले आहे. मुंबई सिटी एफसीचे सामने पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर होणार आहेत. मुंबई सिटी एफसीसह ओडिशा एफसी आणि मोहन बागान हेही क्लब लीगमध्ये खेळणार आहेत.
अशी असेल गटवारी गट A - Pakhtakor, Al Fayha, Ahal FC, Al Ain FCगट B - Al Sadd, FC Nasaf, Al Faisaly, Sharjah FCगट C - Al Ittihad, Sepahan SC, Air Force Club, AGMK FCगट D - Al Hilal, FC Nassaji Mazandaran, Mumbai City, Navbahorगट E - Persepolis, Al Duhail SC, FC Istiklol, Al Nassr ( ख्रिस्तियानो रोनाल्डोचा क्लब)
नोट - चॅम्पियन्स लीगच्या साखळी फेरीत यंदा VAR म्हणजे Video assistant referee ही प्रणाली वापरण्यात येणार आहे.
नेमयारला सौदी अरेबियातील क्लबने मोठी रक्कम दिली आहे. ३१ वर्षांचा नेयमार आता सौदी अरेबियाच्या अल हिलाल क्लबकडून खेळणार आहे. गेल्या वर्षी क्रिस्टियानो रोनाल्डोने युरोपचा क्लब सोडून सौदी अरेबियाच्या क्लबशी करार केला. तेव्हापासून दिग्गज फुटबॉलपटू सातत्याने सौदीकडे वळत आहेत. नेमारच्या आधी करीम बेंझेमा, साने, एन गोलो कांटे हे दिग्गज सौदी अरेबियात गेले.
अल हिलाल खेळताना नेमार ज्युनिअरला सुमारे ९०० कोटी रुपये दरवर्षी मिळतील. नेमारकडे पैशांसोबतच लोक ज्याचे स्वप्न पाहतात त्या सर्व लक्झरी सुविधा असतील. नेमार ज्या घरात राहणार आहे त्या घरात २५ खोल्या असतील. त्याला तीन गाड्या मिळतील, ज्यांची एकूण किंमत १५ कोटीपेक्षा जास्त आहे.