शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

घानाविरुद्ध नायजरला संधीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:38 AM

कुठल्याही संघाची ताकद त्यांच्यातील विश्वासावरून कळते. दोन वेळेचा फिफा अंडर-१७ चॅम्पियन घाना सध्या विश्वासाच्या लहरीवर स्वार आहे. स्पर्धा निर्णायक अवस्थेत पोहोचली नसली तरी घाना संघाचे विरोधक देखील हा संघ तिस-यांदा चॅम्पियन बनू शकतो.

- गुरुप्रीतसिंग संधूकुठल्याही संघाची ताकद त्यांच्यातील विश्वासावरून कळते. दोन वेळेचा फिफा अंडर-१७ चॅम्पियन घाना सध्या विश्वासाच्या लहरीवर स्वार आहे. स्पर्धा निर्णायक अवस्थेत पोहोचली नसली तरी घाना संघाचे विरोधक देखील हा संघ तिस-यांदा चॅम्पियन बनू शकतो, अशी कबुली देतात.घानाचे खेळाडू शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहेतच शिवाय तांत्रिकदृष्ट्या भक्कम आहेत. तरीही हा सामना सहजपणे घेता येणार नसल्याची जाणीव घानाला आहे. विजयासाठी नायजरला सर्वस्व पणाला लावावे लागेल. खेळात काहीही शक्य आहे. बलाढ्य संघाला निराशा पत्करावी लागते. संतुलित असल्याचे आपल्याला वाटत असतानाच पराभवाचा जोरदार धक्का बसतो.घानाच्या युवा संघाची ताकद आहे ती जोरदार हल्ला चढविणे. गोल करण्याची शक्यता निर्माण करणे. उत्कृष्ट समन्वयाच्या बळावर या संघातील खेळाडू वेळेची मागणी लक्षात घेऊन खेळतात, ही या संघाची आणखी एक विशेषता.नायजर संघाने या सामन्याआधी बरीच खलबते केली असतील, असे मला वाटते. पण याचा उलट परिणाम असाही होतो की एखादा संघ आपल्या खेळापेक्षा प्रतिस्पर्धी संघाचाच विचार अधिक करायला लागतो. नायजर संघाने देखील हे ध्यानात घ्यावे. आपल्याला मैदानावर काय पवित्रा घ्यायचा आहे हे विसरू नये. स्वत:च्या डावपेचांवर कायम असावे. संयम पाळावा. घाना संघ थकलेला आहे, हे ओळखण्याइतपत प्रतीक्षा करावी. संधी येताच अलगद गोल जाळीचा वेध देखील घ्यावा. सुरुवातीचे दडपण झुगारुन लावण्यासाठी नायजरच्या खेळाडूंनी चेंडू सतत पास करीत रहायला हवा.लढतीचा निकाल टायब्रेकरपर्यंत लांबेल, ही शक्यता नाकारता येत नाही. नायजरकडे यावर देखील काहीना काही तोडगा नक्कीचअसेल. पण ही एकमेव योजना डोक्यात ठेवून चालणार नाही. आफ्रिकेतील संघ काहीतरी वेगळाच विचार करतात. खेळात वेगवेगळेतंत्र अवलंबतात. हे तंत्र पाहणेफार मजेदार असते. जोखिम पत्करून खेळणे आणि नवे तंत्र मैदानावर अचूकपणे अमलात आणणे यामुळेच आफ्रिकेतील फुटबॉल संघाची योग्यता सरस ठरते.आफ्रिका खंडातील या दोन्ही संघांमधील लढत रोमहर्षक ठरेल, अशी मला खात्री आहे. (टीसीएम)

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017FootballफुटबॉलSportsक्रीडा