गुरप्रीतसिंग संधू लिहितात...रंगतदार सामन्याची अपेक्षा असताना माली व स्पेन यांच्यादरम्यान फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेची दुसरी उपांत्य लढत एकतर्फीच ठरली. यापूर्वी खेळलेल्या लढतींच्या तुलनेत माली संघ वेगवान भासला नाही. खेळाडू थकलेले अधिक जाणवले. माझ्या मते, त्यांच्यावर उपांत्य फेरी खेळण्याचे दडपण अधिक होते. उपांत्य लढतीपूर्वी हा संघ जेवढा शानदार भासला त्यातुलनेत उपांत्य लढतीत मात्र या संघाने निराश केले. स्पेनला रोखण्याच्या तुलनेत माली संघाने अति बचावात्मक पवित्रा स्वीकारला. त्यामुळे स्पेन संघाला वर्चस्व गाजविण्याची संधी मिळाली. सेमी फायनलसारख्या लढतीत जर प्रतिस्पर्धी संघालासंधी प्रदान केली, तर त्याचे मोल द्यावे लागते. या लढतीत स्पेन संघाच्या खेळाचा आलेख उंचावत गेला. माली संघालाही गोल नोंदवण्याच्या संधी मिळाल्या; पण हा संघ अंडर-१७ युरोपियन चॅम्पियनपुढे आव्हान निर्माण करण्यात अपयशी ठरला.स्पेनचा संघ या विजयाचा हक्कदार होता. स्पेनचा युवा स्टार एबेल रुईज सहजपणे स्वाभाविक खेळ करीत असल्याचे दिसले. असे घडते याचा अर्थ, तो प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक ठरणार असल्याचा इशारा असतो. स्पेन संघाने मोजूनमापून खेळ केला. त्यांनी सातत्याने माली संघाचा बचाव भेदण्यात यश मिळविले. त्याचसोबत स्पेनच्या आघाडीच्या फळीतील खेळाडूही वेगवान होते. माली संघाला मिडफिल्डमध्ये त्यांचा प्रेरणादायी कर्णधार मोहम्मद कमाराची उणीव भासली. त्याच्या अनुपस्थितीत माली संघाकडे रणनीती नसल्याचे दिसून आले. अंडर-१७ सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत त्याच्यासारख्या खेळाडूचा पर्याय शोधणे कठीण असते आणि त्याची प्रचितीही आली. एबेल रुईज आता केवळ १७ वर्षांचा आहे; पण त्याचा खेळ अनुभवी खेळाडूप्रमाणे होता. लोक या स्पर्धेत दोन हॅट््ट्रिकसह सर्वाधिक सात गोल नोंदविणाºया इंग्लंडच्या ब्रेवस्टरची प्रशंसा करीत असले, तरी रुईजही भविष्यातील स्टार आहे, हे विसरता येणार नाही. स्पेनचा संकटमोचक रुईज त्याच्या तुलनेत विशेष पिछाडीवर नाही. रुईजच्या नावावर सहा गोलआहेत. अंतिम लढतीत कुणाच्या चेहºयावर हास्य फुलते, यावर सर्वांची नजर असेल. (टीसीएम)
फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत माली-स्पेन लढत एकतर्फीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:51 AM