कोल्हापूर : आॅक्टोबरमध्ये भारतात होणाºया सतरा वर्षांखालील युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाचा दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सराव सुरू आहे. या ठिकाणी मंगळवारी आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ)चे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे यांनी भेट घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले.भारतीय संघ मेक्सिको, कोलंबिया, मलेशिया, सिंगापूर आणि थायलंड येथे सराव करण्यासाठीरवाना होणार आहे. यावेळीसंघाची पटेल व मालोजीराजे यांनी भेट घेऊन सरावाबाबत त्यांची चौकशी केली.खेळाडूंना शुभेच्छा देताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, तुम्ही सगळे भारतीय संघाचे भविष्य असून संपूर्ण राष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला जिद्द व कष्टाच्या जोरावर सिद्ध करून दाखवायचे आहे. मैदानावर सिंहासारखे खेळा, कोणताहीताण- तणाव किंवा दबाव नस्वीकारता खेळा, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. या संघात कोल्हापूरच्या अनिकेत जाधवचा समावेश आहे.
मैदानावर सिंहासारखे खेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 3:06 AM