- रणजीत दळवीसेंट पीटर्सबर्ग हे रशियातील दुसरे मोठे आणि महत्त्वाचे शहर. एके काळची शाही राजधानी! ‘पीटर दी ग्रेट’ या झारने ते अठराव्या शतकाच्या सुरुवातीला वसविले, ते प्रामुख्याने व्यापार-उदिमाचे लक्ष्य समोर ठेवून. हे काही सहजासहजी साध्य झाले नव्हते. त्यासाठी लढाई जिंकावी लागली. रशियन शेतमजूर आणि स्वीडिश युद्धकैदी यांच्या घामातून रशियासाठी युरोपचे प्रवेशद्वार संबोधले गेलेले बंदर उभे राहिले. काय दूरदृष्टी होती पाहा, तीही त्या काळी! सभोवताली जर्मनी, पोलंड, फिनलँड, लॅटिव्हिया, एस्टोनिया, डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वीडन हे देश. सेंट पीटर्सबर्गचा किनारा म्हणजे ‘गल्फ आॅफ फिनलँड’. जसा मुंबईकरता अरबी समुद्र!या घडीला रशियन नौदलासाठी अतिमहत्त्वाचे ठिकाण. त्यांचे पाणबुडीविरोधी बाल्टिक सी फ्लीट, हे छोटेखानी आरमार येथेच तैनात आहे. येथे पाणबुड्याही बांधल्या जातात. भारत याचा लाभार्थी आहे. रशियामध्ये प्रथम बोल्शेव्हिक आणि पाठोपाठ औद्योगिक कामगार व सैन्याची अशा दोन क्रांती झाल्या. झारची जुलमी राजवट व त्याचे विस्तीर्ण साम्राज्य उलथवून टाकण्यात जनतेला यश आले. पुढे झार आणि त्याच्या कुटुंबीयांना गोळ्या घातल्या गेल्या. लेनिनचा त्यात हात होता, असे म्हणतात.पण ज्या राजसत्तेचा त्यांनी अंत केला तिचा मोठेपणा मात्र रशियन मिरवतात याचे वैषम्य वाटले. त्सारने गल्फ आॅफ फिनलँडच्या किनारी एक भव्य ग्रीष्मकालीन राजप्रासाद बांधला. आज तेथे म्युझियम आहे. पीटरची राणी कॅथरिन हिचे दागदागिने, वस्त्रे, तसेच त्सार शाही परिवाराचे ऐश्वर्य दर्शन करणाऱ्या अनेक वस्तू येथे आहेत. ते सारे काही पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. प्रवेश फी फक्त हजार रुपये! हे केवळ बाह्यदर्शनाचे. त्यात राजप्रासादाभोवती पसरलेले विस्तीर्ण पार्क पाहता येते, पण अन्य ठिकाणे पाहण्याचे पैसे वेगळे मोजावे लागतात. प्रचंड वृक्षराजीने नटलेला हे पार्क पायपीट न करता पाहावयाची झाल्यास, आठशे रुबल म्हणजे नऊशे रुपये मोजून ‘हायब्रीड कार’ने फिरायचे. ज्या शाही राजवटीचा मागमूसही ठेवला गेला नाही, त्या सामजवादी - साम्यवाद्यांच्या नव्या राजवटीने मात्र आपला इतिहास, आपली संस्कृती, आपला वारसा याच्या आडून हा प्रासादआणि पार्ककडे कसे पाहिले, हेदिसते.हा प्रासाद दुसºया महायुद्धामध्ये बºयापैकी उद्ध्वस्त झाला होता, पण तो पुन्हा उभा केला गेला. कशासाठी? आपल्या संस्कृतीचे प्रतीक म्हणून जगापुढे ठेवण्यासाठी. तेही कम्युनिस्ट राजवटीत! हे जर मिखाईल गोरबाचेव्ह यांच्या १९८०-९० च्या ऐतिहासिक पेरेस्त्रोईका आणि ग्लासनोस्टसारख्या क्रांतिकारी निर्णयानंतर झाले असते, तर कदचित गळी उतरले नसते. असो. या सर्वातून बोध एकच झाला. आपले मूळ, आपला वारसा, इतिहास, आपली संस्कृती बरी की वाईट, या सर्व गोष्टी ना पुसता येत ना विसरता येत! काळ बदलतो, तसे त्यांची उजळणी करावी लागते!
शाही राजधानी सेंट पीटर्सबर्गची भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 3:47 AM