भारतीय संघाने SAFF चॅम्पियनशीपच्या पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धुतले. भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने ( Sunil Chhetri ) हॅटट्रिक नोंदवून पाकिस्तानला एकहाती धुतले. उदांता सिंगने निर्धारीत वेळेत आणखी एक गोल करून भारताचा ४-० असा दणदणीत विजय निश्चित केला. दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानी खेळाडू अन् भारतीय खेळाडूंमध्ये वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले.
सॅफ स्पर्धा खेळण्यासाठी भारतात उशीराने दाखल झालेल्या पाकिस्तानकडून फार अपेक्षा नव्हतीच.. १०व्या मिनिटाला गोलरक्षकाकडून चूक झाली अन् सुनील छेत्रीने गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १६व्या मिनिटांला भारताला पेनल्टी मिळाली आणि छेत्रीने गोल करून आघाडी दुप्पट केली. पाकिस्तानकडून प्रयत्न होताना दिसले, परंतु भारताचा बचाव भेदणे त्यांच्यासाठी नाकी नऊ ठरले... पहिल्या हाफच्या भरपाई वेळेत भारतीय कोच इगोर स्टीमॅक यांनी पाकिस्तानच्या खेळाडूला थ्रो ईन घेण्यापासून रोखले अन् खेळाडू भडकले. भारतीय खेळाडू व त्यांच्यात वाद झाल्याचे सर्वांनी पाहिले. रेफरींनी स्टीमॅक यांना रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर जाण्यास सांगितले. पण, समोर आलेल्या व्हिडीओनुसार पाकिस्तानी खेळाडूची चूक होती.
सर्वाधिक गोलख्रिस्तियानो रोनाल्डो १२३अली दाईए १०९लिओनेल मेस्सी १०३सुनील छेत्री ९०