लंडन- अर्जेंटिनाच्या सर्गियो ॲग्युरोने इंग्लिश प्रीमियर लीगमधील मॅंचेस्टर सिटी क्लबकडून विक्रमी कामगिरी केली. चेल्सी क्लबविरुद्धच्या कम्युनिटी शिल्ड फुटबॉल स्पर्धेच्या लढतीत ॲग्युरोने गोल करताच तो सिटीकडून २०० गोल करणारा पहिलाच खेळाडू ठरला. त्याचबरोबर त्याने सिटीला जेतेपद पटकावून दिले.
ॲग्युरोने २०११ मध्ये पदार्पणातच स्वानसी सिटीविरूध्द दोन गोल केले होते. युरोप बाहेरील खेळाडूंमध्ये इपीएलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही ॲग्युरोच्या नावावर आहे. त्याशिवाय त्याच्या नावे तीन इपीएल आणि तीन लीग कप जेतेपदे आहेत. मे २०१२ मध्ये क्वीन्स पार्क रेंजर्स विरूध्द ९४ व्या मिनिटाला त्याने केलेला गोल अविस्मरणीय आहे. त्याच्या या गोलने सिटीला ४४ वर्षानंतर प्रीमिअर लीग जेतेपद पटकावून दिले. अॅग्युरोच्या या विक्रमी कामगिरीला क्लबकडून अनोखी भेट देण्यात आली.. पाहा हा व्हिडीओ...