लॉकडाऊनच्या काळातही काही ठिकाणी आता फुटबॉल स्पर्धांना सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांविना आणि नियमांचे काटेकोर पालन करून फुटबॉल सामने खेळवले जात आहेत. अशात रिकामी स्टेडियम भरलेलं दाखवण्यासाठी दक्षिण कोरियाच्या एका फुटबॉल क्लबने पुतळे ठेवले. पण, नंतर माहीत पडलं की, ते पुतळे नसून सेक्स डॉल आहेत. के ली फुटबॉल क्लबनं या प्रकरणाची नंतर माफी मागितली. त्यांच्या या कृतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती आणि अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली.
विराट कोहली स्वतःच्या बायोपिकमध्ये काम करण्यास तयार, पण एका अटीवर
स्टेडियमची रिकामी बाकं भरण्यासाठी काही पुतळे ठेवण्यात आले होते, परंतु ते प्रत्यक्षात सेक्स डॉल होत्या. या कृतीला क्लबनं वितरणकर्त्याला जबाबदार धरले. क्लबने घडलेल्या प्रकाराची माफी मागितली. त्यांनी म्हटले की,''आम्ही चाहत्यांची माफी मागतो. या कृतीची आम्हालाच लाज वाटत आहे. या संकटसमयी आम्ही परिस्थिती आनंदी राखण्याचा प्रयत्न करत आहोत. असे कृत्य पुन्हा घडू नये, याचा विचार करण्याची गरज आहे.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
मर्यादा ओलांडू नकोस, अन्यथा तुझी लायकी दाखवून देईन; आफ्रिदीच्या विधानानंतर हरभजन सिंग भडकला
22 कोटींना घेऊन आलास, तरी काश्मीर आमचाच होता अन् राहणार; 'गब्बर'नं आफ्रिदीला खडसावलं
सध्याच्या परिस्थितीत IPL 2020 होणं अवघड, BCCIनं मांडलं परखड मत
भीक मागून जगणाऱ्या तुझ्या देशासाठी काहीतरी कर; सुरेश रैनानं आफ्रिदीला जागा दाखवली
युवराज सिंगनं दिली गुड न्यूज; लवकरच घरी हलणार पाळणा?
'त्या' कोरोना रुग्णाच्या मदतीसाठी इरफान पठाणचा पुढाकार!