मॉस्को : फुटबॉल वर्ल्डकपसाठी रशियात आलेल्या लाखो परदेशातील फुटबॉल रसिकांनी सुरेख यजमानाचा आनंद घेतला आहे. तथापि, वर्ल्डकपमध्ये खेळत नसतानाही अशा एका देशातील पर्याटकांसाठी रशियाचा प्रवास सुरेख अनुभव देणारा ठरला आहे.रशियात जोरदार स्वागताचा आनंद घेण्यासाठी फक्त ‘मी भारतातून आलोय’ असे म्हटल्यानंतर बॉलिवूड चाहते असणाऱ्या या देशात प्रेमळ हास्याने आपले स्वागत होते. रशियाचे राज कपूर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्याप्रती असलेले प्रेम जगजाहीर आहे. भारताप्रती असणाºया प्रेमापोटीच रशियातील दुकानांमध्येही भारतीयांना सवलत दिली जात आहे.येथील एका स्थानिक दुकान मालकाने म्हटले की, ‘‘मला भारत, भारतीयांचा आहार, नागरिक, चित्रपट आणि रंगांशी प्रेम आहे. आम्ही त्यांना नेहमीच सूट देत असतो.’ एका टूर गाईडने म्हटले, ‘‘रशियन लोकांना भारताशी विशेष स्नेह आहे आणि त्यांच्याशी ते नेहमीच स्नेहाने वागतात.’’ (वृत्तसंस्था)वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ खेळत नाही; परंतु अंतिम सामन्यासाठी मोठ्या संख्येने भारतीय येथे आले आहेत. अशा प्रकारे पर्यटकांची संख्येत २० ते ३० टक्के वाढल्याचा अंदाज आहे. विश्वचषकासाठी येथे आलेल्या एका भारतीय पर्यटकाने म्हटले की, ‘रशिया नेहमीच भारतीयांचे जोरदार स्वागत करणारा देश आहे. पश्चिमेतील लोकांना आता याचा अनुभव येत आहे; परंतु आम्हा भारतीयांना हे प्रदीर्घकाळापासून माहीत आहे.’>आणि तिरंगा फडकला... विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाचा सहभाग नसला, तरी मोठ्या संख्येने रशियामध्ये उपस्थित असलेल्या भारतीय फुटबॉलप्रेमींमुळे भारतातील फुटबॉल क्रेझची झलक दिसून येत आहे. असाच एक प्रत्यय बेल्जियम विरुद्ध इंग्लंड या तिसºया स्थानासाठी झालेल्या लढतीत आला. या सामन्यासाठी एकूण ६४,४०६ प्रेक्षकांची उपस्थिती होती, परंतु भारतीय गटाने फडकावलेला तिरंगा लक्षवेधी ठरला.
रशियात भारतीयांचे जोरदार स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 3:44 AM