मोंटेव्हिडिओ - विश्वकप स्पर्धेत स्टार खेळाडू लुई सुआरेजवर नियंत्रण राखावे लागेल, याला उरुग्वे संघाने प्राधान्य दिले आहे. इटलीचा डिफेंडर जॉर्जियो चिलिनीला चावा घेतल्यामुळे सुआरेजला २०१४ च्या विश्वकप स्पर्धेतून बाहेर करण्यात आले होते. त्यानंतर उरुग्वेचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाविरुद्ध पराभूत झाला होता.आता मी बदललो आहे, असा दावा सुआरेजने केला आहे. ब्राझीलच्या तुलनेत रशियात माझे वर्तन चांगले राहील, असेही तो म्हणाला. ब्राझीलमध्ये बंदी येण्यापूर्वी सुआरेजने दोन गोल नोंदवले होते.सुआरेज म्हणाला,‘ती माझी चूक होती. त्यामुळे मला माझे व उरुग्वेचे ऋण फेडायचे आहे. चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा माझा प्रयत्न राहील.’ दोनदा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या उरुग्वेसाठी सध्या विश्वकप स्पर्धेपूर्वी चांगल्या बाबी घडत आहेत. यापूर्वी चारवेळा विश्वकप प्ले-आॅफमध्ये खेळत तीन स्पर्धात स्थान मिळणाºया उरुग्वेने यावेळी पात्रता फेरीत ब्राझीलनंतर दुसरे स्थान पटकावत थेट रशियातील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
सुआरेजने दिले वर्तन सुधारण्याचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 1:47 AM