शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Sunil Chhetri : सुनील छेत्री आशियाई स्पर्धेत खेळणार, २३ वर्षांखालील संघात एकमेव वरिष्ठ खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 05:56 IST

Asian Games: चीनमध्ये या महिन्यात रंगणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष फुटबॉल संघात वरिष्ठ खेळाडू म्हणून केवळ सुनील छेत्रीची निवड झाली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) १८ सदस्यीय भारतीय संघाची निवड केली.

नवी दिल्ली : चीनमध्ये या महिन्यात रंगणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष फुटबॉल संघात वरिष्ठ खेळाडू म्हणून केवळ सुनील छेत्रीची निवड झाली आहे. अखिल भारतीयफुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) १८ सदस्यीय भारतीय संघाची निवड केली.

आशियाई क्रीडा स्पर्धेत फुटबॉल सामन्यांत केवळ २३ वर्षांखालील खेळाडूंना खेळता येणार आहे. मात्र, सर्व संघांना अंतिम संघात केवळ तीन वरिष्ठ खेळाडूंना खेळविण्याचीही मुभा देण्यात आली आहे. परंतु, एआयएफएफने यावेळी वरिष्ठ खेळाडूंपैकी केवळ छेत्रीची निवड केली आहे. याआधी १ ऑगस्टला जाहीर झालेल्या २२ सदस्यीय संघात छेत्रीसह संदेश झिंगन आणि गुरप्रीतसिंग संधू यांचाही समावेश होता. परंतु, आता केवळ छेत्रीला संघात स्थान देण्यात आले आहे.

अ गटात समावेशभारतीय संघाचा अ गटात समावेश असून स्पर्धेत एकूण २३ फुटबॉल संघ पदकासाठी खेळतील. अ, ब, क, ड, ई, फ असे सहा गटांमध्ये विभागणी करण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटात चार संघ असून केवळ ड गटात तीन संघांचा समावेश आहे. भारताला अ गटामध्ये यजमान चीन, बांगलादेश आणि म्यानमार यांचा सामना करायचा आहे.

१९७० पासून पदकाची प्रतीक्षाभारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत १९५१ आणि १९६२ साली सुवर्णपदक पटकावले होते. यानंतर १९७० साली कांस्यपदक जिंकले. मात्र, यानंतर भारतीय संघाला या स्पर्धेत एकही पदक जिंकता आलेले नाही. 

यंदा मोठी आशाभारतीय संघाने प्रशिक्षक इगोर स्टिमक यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा सॅफ अजिंक्यपद स्पर्धा जिंकतानाच फिफा क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल १०० स्थानांमध्येही प्रवेश केला. यामुळे यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाकडून पदक जिंकण्याच्या मोठ्या आशा आहेत.

विशेष परवानगीसुरुवातीला केंद्र सरकारकडून भारतीय पुरुष व महिला फुटबॉल संघाला आशियाई स्पर्धेत खेळण्यासाठी परवानगी मिळाली नव्हती. आशियातील अव्वल आठ संघांनाच या स्पर्धेत खेळण्याची अट केंद्र सरकारने ठेवली होती. मात्र, नंतर भारताच्या दोन्ही संघांना विशेष परवानगी देण्यात आली. याआधी २०१४ साली भारतीय फुटबॉल संघाने अखेरची आशियाई स्पर्धा खेळली होती. 

भारतीय पुरुष  फुटबॉल संघगुरमित सिंग, धीरज सिंग, सुमित राठी, नरेंद्र गहलोत, अमरजित सिंग कियाम, सॅम्युअल्स जेम्स, राहुल केपी, अब्दुल रबीह, आयुष देव छेत्री, ब्रायस मिरांडा, अजफर नूरानी, रहीम अली, विन्सी बरेटो, सुनील छेत्री, रोहित दानू, गुरकीरत सिंग आणि अनिकेत जाधव. 

टॅग्स :Sunil Chhetriसुनील छेत्रीFootballफुटबॉलIndiaभारत