जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 1 कोटी 34 लाख 95,134 इतकी झाली आहे. त्यापैकी 78 लाख 80,340 रुग्ण बरे झाले असून 5 लाख 82,125 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 9 लाख 41,630इतका झाला आहे. 5 लाख 94,111 रुग्ण बरे झाले असून 24,371 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या रविवारी भारताचा माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांना कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले होते आणि त्यांना लखनौ येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बुधवारी भारतीय क्रीडा विश्वाचं टेंशन वाढवणारे वृत्त समोर आले आहे.
लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडून भारतीय क्रिकेटपटूची पत्नी करतेय समाजसेवा!
दोन वेळच्या जेवणाचीही वानवा, पण 'या' पोराचा रिझल्ट पाहा... भूगोलात तर 100 पैकी 100
भारताचे दिग्गज फुटबॉलपटू आणि ध्यानचंद पुरस्कार विजेते सय्यर शाहिद हकिम यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यांच्यावर हैदराबाद येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. 81 वर्षीय हकीम हे 1960च्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय फुटबॉल संघाचे सदस्य होते. त्यांनी सांगितले की,''होय मला सहा दिवसांपूर्वी कोरोना झाला आहे आणि मी सध्या हैदराबाद येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेत आहे. माझी प्रकृती सुधारत आहे आणि लवकरच कोरोना अहवाल निगेटिव्ह येईल अशी अपेक्षा आहे.''
कर्नाटक येथील गुलबर्गा येथे गेले असताना प्रकृती खालावल्याचं हकिम यांनी सांगितले. ''गुलबर्गा येथे गेलो असताना मला ताप आला आणि तेथे मी तापावरील औषध घेतलं. नंतर मी छातीचा एक्स रे काढला आणि तेथे मला निमोनिया झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर मला कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिला गेला आणि त्यात मी पॉझिटिव्ह आढळलो,''असे ते म्हणाले.
हकिम यांना 2017मध्ये ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारानं गौरविण्यात आले. 2011मध्ये शब्बीर अली यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. फुटबॉल कारकिर्दीनंतर हकिम हे 1989पर्यंत आंतरराष्ट्रीय सामन्यांत रेफरीच्या भूमिकेत होते. 1988मध्ये कतार येथे झालेल्या AFC आशिया कपमध्ये ते सामनाधिकारी होते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
दक्षिण आफ्रिकेत 18 जुलैला होणार आगळावेगळा सामना; पण सहा जणांना कोरोनाची बाधा!
ज्योतिरादित्य, सचिन पायलटनंतर कोण?... राहुल जी?; भारताच्या माजी क्रिकेटपटूची 'कमेंट' व्हायरल
25 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूची कोरोनावर मात; पत्नी अजूनही पॉझिटिव्ह
कौतुकास्पद! 15व्या वर्षी भारताला जिंकून दिलं ऐतिहासिक सुवर्ण अन् आता CBSE बोर्डात केली कमाल
ट्वेंटी-20 लीगचे वेळापत्रक जाहीर; स्मिथ, वॉर्नरच्या फटकेबाजीचा रंगणार थरार