- रोहित नाईक ।मुंबई : पहिल्या सत्रात राखलेल्या वर्चस्वानंतर दुसºया सत्रात झालेल्या काही चुकांमुळे भारतीय फुटबॉल संघाला तिरंगी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सेंट किट्स आणि नेविस संघाविरुध्द १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. दरम्यान, पहिल्या सामन्यात मॉरिशसला नमवलेल्या भारताने आंतरराष्ट्रीय तिरंगी फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सेंट्स किट्स आणि नेविसने आपले दोन्ही सामने बरोबरीत राखले. भारताकडून जॅकीचंद सिंग, तर सेंट किट्स आणि नेविसकडून अमोरी ग्वाऊने याने गोल केला. मुंबईतील अंधेरी येथील मुंबई फुटबॉल अरेना स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात दोन्ही संघ तोडीस तोड खेळ केला. फिफा क्रमवारीत ९७व्या स्थानी असलेल्या भारताचा या सामन्यातही विजय मानला जात होता.परंतु, १२५व्या स्थानी असलेल्या सेंट किट्स आणि नेविसने चांगलेच झुंजवले.भारताच्या हुकलेल्या संधी...- १८व्या मिनिटाला डावीकडून हालीचरणने दिलेला अप्रतिक पासवर बलवंतने सुंदर हेडर केला, पण चेंडू गोलपोस्टच्या वरुन गेला.- २७ मिनिटाला नारायण दासने घेतलेल्या फ्री किकवर बलवंत सिंगने चेंडूला गोलजाळ्याची दिशा दिली, पण रेफ्रीने आॅफसाईडचा इशारा केल्याने गोल अवैध.यानंतर लगेच युजेनसन लिंगदोहने मारलेल्या कॉर्नर किकवरही गोलची संधी मिळाली. परंतु सेंट किट्सने बचाव केला.- ४३व्या मिनिटाला ‘जेजे’ला गोल करण्याची नामी संधी मिळाली, परंतु चेंडू थोडक्यात गोलपोस्टपासून दूर गेला.- ५०व्या मिनिटाला प्रितम कोटलच्या पासवर जेजे गोल करण्यात अपयशी.
तिरंगी फुटबॉल मालिका : भारताला जेतेपद , अखेरच्या सामन्यात सेंट किट्स आणि नेविसने बरोबरीत रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 3:15 AM