Asian Cup qualifier India vs Afghanistan : एएफसी आशियाई चषक क्वालिफायर स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजयी मालिका कायम राखली. कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने २-१ अशा फरकाने अफगाणिस्ताचा पराभव केला. सुनील छेत्री ( ८६ मि.) व सहल अब्दुल समद ( ९१ मि.) यांनी गोल केले.
याआधी भारताने २-० अशा फरकाने कम्बोडियावर विजय मिळवला होता. आता भारताचा पुढील लढतीत हाँगकाँगचा सामना करावा लागणार आहे. भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने अफगाणिस्तानचे खेळाडू खिलाडूवृत्ती विसरले आणइ सामन्यानंतर त्यांनी भारतीय खेळाडूंवर हात उचलला. सोशल मीडियावर या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अफगाणिस्तानचे ३ व भारताचे २ खेळाडू यांच्यात वाद सुरू असताना दिसतोय. अशात गोलरक्षक गुरप्रीत सिंह मधस्ती करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतो. पण, त्याने अफगाणिस्तानच्या खेळाडूला धक्का दिला आणि त्यानंतर अफगाणी खेळाडूने त्याला मारले. त्यानंतर प्रकरण आणखीनच चिघळले.
२०१६नंतर भारतीय संघाचा अफगाणिस्तानवरील हा पहिलाच विजय आहे. याआधीच्या दोन सामन्यांत अफगाणिस्तानने भारताया बरोबरीत रोखले होते. भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या ११ सामन्यांत ७ विजय मिळवले आहेत, तर दोनमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.