मुंबई : एम. युनाइटेड फाऊंडेशनच्यावतीने मुलींसाठी “युनायटेड वुमन्स प्रीमियर लीग” (युडब्ल्यूपीएल) या फुटबॉल चॅंम्पियनशिपचे दुसरे पर्व ७ एप्रिल ते १३ मे २०१८ दरम्यान हॉटफुट साउथ युनायटेड फुटबॉल क्लब येथे रंगणार आहे. या फुटबॉल चॅंम्पियनशिप स्पर्धेत मुंबईतील मुलींच्या १२ संघांमध्ये जेतेपदासाठी झुंज पाहायला मिळणार आहे.
फुटबॉल खेळणाऱ्या होतकरू मुलींसाठी ५-ए-साइड रिंक फुटबॉल लीगचे आयोजन केले असून अशा प्रकारच्या महिला लीग फुटबॉल चॅंम्पियनशिप स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. अशी स्पर्धा आजपर्यंत कधीही झाली नव्हती ती गेल्या वर्षापासून मुंबईत सुरु करण्यात आली आहे. या लीगची सुरुवात ७ एप्रिल ते १३ मे २०१८ या कालावधीत दर शनिवारी व रविवारी सायंकाळी ७.०० वाजता सुरू होणार आहे. युनायटेड वुमन्स प्रीमियर लीग (युडब्ल्यूपीएल) ही फुटबॉल स्पर्धा यावर्षीही मुंबई पोलिसांना समर्पित करण्यात येणार आहे.
फुटबॉल खेळणाऱ्या मुलींसाठी हे एक उत्तम व्यासपीठ असून त्यांना या स्पर्धेमध्ये खेळून फुटबॉल खेळाचा चांगला अनुभव घेता येईल. व त्यांसाठी हा एक मोलाचा अनुभव ठरेल. ह्या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ सर्व संघांविरुद्ध खेळेल. ज्या संघांचे स्पर्धेच्या शेवटी सर्वोच्च गुण असतील त्या संघाला विजेता घोषित केले जाईल. स्पर्धेतील विजेता आणि उपविजेत्यांना चषक व रोख रकमेचे परितोषिक देऊन सन्मानित केले जाईल.