फिलिप ब्लँक्स हा फुटबॉलपटू आता सोशल मीडियावर स्टार झाला आहे. 28 वर्षीय फुटबॉलपटूनं एका 3 वर्षांच्या मुलाला जीवाची बाजी लावून वाचवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर फिलिपच्या शौर्याचे कौतुक होत आहे.
मिशीगॅन येथील कालामाझू सेंट्रल हायस्कूलचा माजी फुटबॉलपटू आणि यूएस मरिनचा निवृत्त अधिकारी असलेला फिलीप आपल्या मित्राच्या घरी गेला होता. फोएनिक्स येथील मित्राच्या घरा शेजारील अपार्टमेंटला अचानक आग लागली आणि त्या आगीत अडकलेल्या माय-लेकाच्या किंचाळण्याचा आवाज फिलिपनं ऐकला आणि तो ताडतीनं धावत गेला. आगीत अडकलेल्या आईनं तिच्या 3 वर्षांच्या मुलाला तिसऱ्या माळ्यावरून खाली फेकून दिले आणि फिलिपनं धावत येत त्या मुलाला झेलून त्याचा जीव वाचवला. 10 जुलैला ही घटना घडली.
आगीपासून वाचवण्यासाठी आईनं त्या मुलाला खाली फेकलं होतं. तो मुलगा सुरक्षित आहे, परंतु त्या आईचा होरपळून मृत्यू झाला. हा सर्व प्रकार एका व्यक्तीनं मोबाईल कॅमेरात कैद केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर फिलिपच्या प्रसंगवधानाचे कौतुक होत आहे. याच आगीत 9 वर्षीय मुलाचेही प्राण वाचवण्यात आले आहे. फिलिप म्हणाला,''त्या मुलाचे आयुष्य वाचवल्यानंतर माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. आपल्या आयुष्याची किंमत मला कळली. एकमेकांशी तंटा करून आयुष्य घालवण्यापेक्षा एकमेकांची काळजी घ्यायला हवी.''
पाहा व्हिडीओ...
अन्य महत्त्वाच्या बातम्या
दिग्गज खेळाडूच्या मुलाचा 'हॉट' अभिनेत्रीसोबत साखरपुडा; फोटो व्हायरल
... म्हणून शिखर धवनची पत्नी किक बॉक्सिंग शिकली; सत्य जाणून बसेल धक्का!
महेंद्रसिंग धोनीनंतर विराट कोहलीचा लॉकडाऊन लूक व्हायरल; डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!
ENG v PAK : पाकिस्तानी क्रिकेटपटूंची राहण्यासाठी सोय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही तर...
भारत-पाकिस्तान मालिका विचारातच घेत नाही, कारण...; पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं वादग्रस्त विधान