शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

मेस्सी फुटबॉलचा ‘सचिन तेंडुलकर’ ठरणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 7:32 AM

सचिन तेंडुलकर आणि लिओनेल मेस्सी हे दोन्ही दिग्गज आपापल्या खेळामध्ये श्रेष्ठं, यात वाद नाही. सचिनने आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने संपूर्ण क्रिकेटविश्वावर भुरळ टाकली, तर दुसरीकडे सुपरस्टार मेस्सीने आपल्या अप्रतिम पददालित्यने सा-या फुटबॉलविश्वास स्तब्ध केले.

- रोहित नाईकमुंबई : सचिन तेंडुलकर आणि लिओनेल मेस्सी हे दोन्ही दिग्गज आपापल्या खेळामध्ये श्रेष्ठं, यात वाद नाही. सचिनने आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने संपूर्ण क्रिकेटविश्वावर भुरळ टाकली, तर दुसरीकडे सुपरस्टार मेस्सीने आपल्या अप्रतिम पददालित्यने सा-या फुटबॉलविश्वास स्तब्ध केले. हे दोन्ही लिजंड खेळाडू क्रीडाप्रेमींसाठी देव असल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, अशी यांची कामगिरी. ज्याप्रमाणे भारताला आपल्या क्रिकेटविश्वविजेतेपदासाठी कायम सचिनवर अवलंबून रहावे लागत होते, त्याप्रमाणेच गेल्या दोन वर्षांपासून अर्जेटिनाच्या  जगज्जेतेपदाच्या आशा मेस्सीवर अवलंबून आहेत. सचिनने आपल्या देशाची इच्छा पूर्ण केली २०११ साली आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर, तर आता मेस्सीलाही नेमकी अशीच संधी चालून आली आहे. त्यामुळेच मेस्सी फुटबॉलचा सचिन तेंडुलकर ठरणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे कोलकाताच्या ‘अर्जेंटिना फॅन क्लब’ने. जगभरात अर्जेंटिनाचे आणि मेस्सीचे चाहते पसरले आहेत. भारतात फुटबॉलची सर्वाधिक क्रेझ असलेल्या कोलकातामध्येही अर्जेटिना व मेस्सी चाहत्यांची कमी नाही. या सर्वांची पूर्ण खात्री आहे की, सध्या आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर असलेला मेस्सी तेंडुलकरप्रमाणेच देशाला विश्वविजयी करण्यास त्वेषाने खेळेल. क्रिकेटच्या मैदानावर जवळपास सर्वच विक्रमांना गवसणी घातलेल्या सचिनला कायम जगज्जेतेपदाने हुलकावणी दिली. २००३ साली सचिनला विश्वविजेतेपद उंचावण्याची संधी मिळालीही होती, पण अंतिम आॅस्टेÑलियाच्या तुफानी खेळीपुढे ते स्वप्न अखेर अधुरेच राहिले. मात्र, कारकिर्दीतील अखेरचा विश्वचषक आणि तोही मायदेशात खेळताना सचिनने भारताच्या विश्वविजेतेपदात मोलाचे योगदान दिले आणि खºया तेव्हा कुठे सचिनला आपल्या कामगिरीचे सार्थक झाल्याचे वाटले. अगदी अशीच संधी यंदा मेस्सीला मिळाली आहे. २०१४ साली झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेस्सीने आपल्या जादुई कामगिरीच्या जोरावर अर्जेंटिनाला अंतिम फेरीत नेले. मात्र, मोक्याच्यावेळी झालेली चूक महागात पडल्याने त्यांना जर्मनीविरुद्ध निसटात पराभव पत्करावा लागला आणि मेस्सीच्या हातून विश्वचषकही निघून गेला. यानंतर मोठ्या टिकेला सामोरे जावे लागल्याने मेस्सीने आंतरराष्ट्रीय स्पर्धांतून निवृत्तीही घेतली. मात्र, देशवासीयांच्या प्रेमाखातर त्याने पुनरागमन केले आणि आता त्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाला जगज्जेतेपद मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. क्लब फुटबॉलमध्ये बार्सिलोना एफसीला जवळपास सर्व जेतेपद पटकावून दिलेल्या मेस्सीला देशासाठी विश्वविजेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळेच यंदा अर्जेंटिनाच्या सर्व आशा मेस्सी मॅजिकवर लागल्या आहेत. शिवाय मेस्सी आता ३० वर्षांचा असल्याने यंदाचा विश्वचषक त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा मानला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये तो सचिनप्रमाणेच आपल्या अखेरच्या स्पर्धेत आपल्या देशाला जगज्जेता करु शकतो असा विश्वास ‘अर्जेंटिना फॅन क्लब’चे सचिव उत्तम साहा यांनी व्यक्त केला आहे.   अर्जेंटिनाचे कट्टर चाहते असलेल्या उत्तम साहा यांनी १९७८ साली देखील अर्जेंटिना समर्थकांची ‘अमरा’ नावाची एक टीम बनवली आहे. त्यावेळी दिएगो मॅरेडोनाच्या जादुई खेळाच्या जोरावर अर्जेंटिनाने विश्वविजेतेपद पटकावले होते. यंदा मेस्सीदेखील याच प्रकारचा जादुई खेळ करत अर्जेंटिनासाठी विश्वविजेतेपद पटकावले असा ठाम विश्वास साहा यांना आहे.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉल